आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडीसह खळी , खरशिंदे वन क्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यात उन्हाळाभर टँकरद्वारे पाणी सोडून वन परीक्षेत्रात वावरणाऱ्या मुक्या वन्यजीवांसह प्राण्यांची तहान भागविण्याचा अनोखा उपक्रम खरशिंदे बिटचे वन रक्षक हरिचंद्र जोजर हे राबविताना दिसत आहे.

आता कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने वनांमधील डबक्यांसह छोट्या-मोठ्या ओढ्यातील पाणी वाढत्या तापमानामुळे पुर्णतः आटले आहे. वन परीक्षेत्रातील मुक्या वन्य प्राणी व वन्य जीवांना पिण्याच्या पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे भटकंती करावी लागू नये, याची दक्षता घेत जोजर यांनी पानोडी वन परीपरीक्षेत्रातील वन्य विभागात कृत्रीम व सिमेंटच्या पाणवठ्ये बनवून यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करून वन परीक्षेत्रात आढळणाऱ्या मुक्या वन्य प्राण्यांसह वन्य जीवांची तहाण भागविण्याचे काम हरिचंद्र जोजर करीत आहेत.

हा उपक्रम अ.नगर जिल्ह्याच्या उपवन संरक्षक धर्मविर सालविठल व सहाय्यक वन संरक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन परीक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे यांच्या सूचनेनुसार वन रक्षक जोजार राबवित आहेत.

सध्या तळपत्या उन्हामुळे माणसांना पाण्यासाठी वण-वण भटकंती करावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत मुक्या प्राण्यांनी पाणी कुणाकडे मागावे, ही मुकी भावना लक्षात घेवून जंगलात जागोजागी पाणवठे तयार करण्याचे धोरण ठेवले. त्यात पाणी टाकण्याची व्यवस्था सुरु केली. यातून मानसिक समाधान लाभते.
हरिचंद्र जोजर, वन रक्षक

