आमदार सत्यजित तांबे यांच्या मदतीतून माघाडे भगिनी भारावल्या

संगमनेर । झुंजार न्यूज

दुपारी दोनच्या सुमारास भर उन्हामध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंची अचानक झालेले आगमन, गावातील नागरिकांची धावपळ, आमदार सत्यजित तांबे यांचे नियोजन आणि सर्व आबाल महिलांमधील परदेशी पाहुण्यांबद्दलची उत्सुकता अशा आनंदमय वातावरणात चक्क ऑस्ट्रेलियन क्रिकेट आपल्या घरी पाहून घुलेवाडीतील माघाडे भगिनी आनंदाने भारावून गेल्या.

Oplus_131072
घुलेवाडी येथील म्हसोबा नगर मध्ये राहणाऱ्या अंजली माघाडे व गायत्री माघाडे या भगिनी अत्यंत चांगल्या क्रिकेट खेळतात. या भगिनींना आमदार सत्यजित तांबे यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरच्या माध्यमातून सातत्याने मोठी मदत केली आहे. ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघाबरोबर संगमनेर इलेव्हन संघातील होणाऱ्या सामन्याच्या प्रॅक्टिस साठी या भगिनी उपस्थित होत्या. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. अशा परिस्थितीतही त्या मोठ्या आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत आहे. आणि याचे कौतुक सत्यजित तांबे यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना सांगितले.
Oplus_131072
यावेळी या सर्व क्रिकेटपटूंनी त्या गरीब मुलीच्या घरी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली यानुसार डॉ.मैथिलीताई तांबे यांनी पुढाकार घेऊन घुलेवाडीत जाऊन माघाडे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी या कुटुंबीयांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने गंध लावून त्यांचे स्वागत केले. या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी या दोन्हीही भगिनींना ऑस्ट्रेलियन संघाची जर्सी देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Oplus_131072
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी सातत्याने काम केले जात आहे. तरुण व तरुणींसाठी शिक्षण, क्रीडा, कला यांचा विविध क्षेत्रात वाव देण्यासाठी उपक्रम राबवले जात आहे. अंजली व गायत्री अत्यंत चांगल्या क्रिकेट खेळत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची चांगली सुविधा नाही. कोच,आहार याबाबत माहिती नाही अशा कठीण परिस्थिती ही त्या चांगल्या क्रिकेट खेळत आहेत. भारतामध्ये गुणवत्ता खूप आहे. त्याला वाव मिळाल्यास ही मुले संधीचे सोने करतात. 14 एप्रिल ते 14 मे 2025 या काळामध्ये संगमनेर मध्ये क्रिकेट मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुद्धा युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे. अजिंक्य रहाणे पूनम खेमनर सारखे खेळाडू संगमनेर मधून तयार झाले आहेत. विविध खेळांमध्ये जास्तीत जास्त खेळाडू संगमनेर व जिल्ह्याचे असावेत यासाठी आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
Oplus_131072
तर या टीमचा कोच जेम्स म्हणाला की, अत्यंत अवघड परिस्थितीतून भारतातील गुणवत्ता तयार होत असते. संघर्ष हा त्यांना नवीन नसून त्यामुळे क्रिकेटमध्ये भारताचा मोठा दबदबा निर्माण झाला आहे. यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींनी या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटून बरोबर विविध फोटो काढले.
Oplus_131072

आमदार सत्यजित तांबे यांच्यामुळे अविस्मरणीय क्षण – माघाडे भगिनी

आमची परिस्थिती गरिबीची आहे. मात्र खेळण्याची मोठी जिद्द आहे. आमचा खेळ पाहून सत्यजित दादा व थोरात साहेब यांनी आम्हाला कायम मदत केली आहे. यापुढे आम्हाला देशाकडून खेळायचे आहे. आज आमच्या गरिबाच्या घरी ऑस्ट्रेलियन पाहुणे आले यावर आमचा विश्वास बसत नाही. हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचे अंजली व गायत्री माघाडे यांनी म्हटले असून त्यांच्या आई – वडिलांनी आ.सत्यजित तांबे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed