अहिल्यानगर जिल्हयातून ” रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी ” मोठया संख्येने उपस्थित राहावे : विजयराव वाकचौरे , सुनिल साळवे , सुरेंद्र थोरात
आश्वी । झुंजार न्यूज
बिहार राज्यातील गया येथील महाबोधिविहार समिती ही बौद्ध समाज बांधवांचीच असावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून बुद्ध गया येथे देशातील शकडो बौद्ध भिक्कू संघांचे लोकशाही मार्गाने आंदोलन सूरू असून या सूरू असलेल्या आंदोलनाची अजूनही शासन पातळीवरून दखल घेतली जात नसल्यामुळे भिक्कु संघांच्या प्रमुख मागणीला पाठिंबा देण्यासाठी
येत्या शनिवार दि.२९ मार्चपासून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध गया येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार असून या आंदोलनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांसह फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले ) प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकचौरे , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे व उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना वाकचौरे म्हणाले की, बुध्द गया येथील बुद्ध विहारामध्ये बिहार राज्यामध्ये १९४९ साली जो कायदा करून समिती स्थापन केलेली आहे ती ९ जणांची असून त्यामध्ये ४ हिंदू, ४ बौद्ध व १ जण त्या ठिकाणी असणारे जिल्हाधिकारी असतील अशी समिती घेण्याचा कायदा केलेला आहे .

मात्र कायदयावर तिलाजंली देण्यात येवून या ठिकाणी एखादा बौद्ध जिल्हाधिकारी नियुक्त केला तरी ही त्या बौद्ध जिल्हाधिकाऱ्यांस स्थान दिले जात नसल्याचे दिसून येत आहे . हिंदू असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यास मात्र स्थान दिले जाते हा गेल्या अनेक दिवसापासून बौध्दावर अन्याय होत आहे .

या होणाऱ्या घटनेस आज जवळपास ७६ वर्ष पूर्ण झाली असून भारत देश हा सुवर्णं महोत्सव वर्षात असताना एखादया समाज्यावर हा अन्याय होणे हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाणा घातल्यासारखा आहे . होत असलेली मागणी ही रितसर स्वरूपाची असून ही या मागणीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे .

या मागणीसाठी देशातील भिक्कु संघांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या मागणीला मोठया प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने अहिल्यानगर जिल्हयातून सुध्दा या मागणीला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि २९ मार्च २०२५ पासून बुद्ध गया येथे जाऊन आंदोलन सूरू करण्यात येणार असून या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर मधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन विजयराव वाकचौरे , सुरेंद्र थोरात व सुनिल साळवे यांनी केले आहे.
Post Views: 692
