संगमनेर । झुंजार न्यूज
कासारा दुमाला येथील भोलेनाथ दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मा. मंत्री तथा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते, तर राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

या उपक्रमामुळे दुग्ध व्यवसाय अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम होणार असून या संस्थेच्या ऊर्जा खर्चात मोठी बचत होईल, आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही यांचा फायदा होणार आहे.

कार्यक्रमास संघाचे संचालक विलासराव वर्षे, डॉ. प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, भोलेनाथ संस्थेचे चेअरमन बाळासाहेब म्हस्के, व्हा. चेअरमन अभिजीत सावंत, तसेच सर्व संचालक मंडळ, दूध उत्पादक शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
