आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी व परिसरातील आश्वी बु॥ , आश्वि खुर्द , पानोडी , शिबलापूर , मालुंजे , शेडगांव या गावातील मुस्लिम समाजाचे प्राबल्य असून रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. रमजान महिन्यात लहानग्यासह मोठयांनी रोजे ठेवून मुस्लिम बांधवांनी श्रद्धेने उपवास ठेवतात व अखेर चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद साजरा करतात.


सोमवारी सकाळी, मुस्लिम बांधवांनी नवीन वस्त्र परिधान करून, अत्तर व सुरमा लावून मस्जिदमध्ये जाऊन सामूहिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने या सणाचा आनंद लुटला. ईदच्या निमित्ताने घराघरात शीरखुर्मा, बिर्याणी, हलीम, फिरनी आणि इतर पारंपरिक पदार्थांची रेलचेल होती.


रमजान ईद सण हा केवळ धार्मिक नाही, तर बंधुभाव, प्रेम आणि सौहार्द वाढवण्याचा दिवस आहे. रमजान महिन्यात महिनाभर उपवास केल्यानंतर, ईदच्या दिवशी आनंदाने गोडधोड भोजन करून हा सण साजरा केला जातो. पालघर आणि आसपासच्या भागातही यंदा ईद उत्साहात साजरी झाली. अनेक मुस्लिम बांधव आपल्या इतर धर्मीय मित्रांना सुद्धा रमजान ईद निमित्त घरी बोलवून शीरखुर्मा, गोडधोड खाद्यपदार्थ अशी मेजवानी देतात”
