आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पिंप्री लौकी अजमपूर येथील ग्रामदैवत असणाऱ्या शनि महाराज यांचा शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५ ते दि. ६ एप्रिल २०२५ तीन दिवशीय यात्रा उत्सव होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीनी दिली .

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दि . ४ एप्रिल रोजी पिंप्री लौकी येथून शनि शिंगणापूर येथे तरुणाईच्या माध्यमातून ‘ ज्योत ‘ रवाना होणार त्यानंतर शनिवार दि.५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पिंप्री फाटा ते गांवापर्यत वाजत – गाजत ‘ ज्योत ‘ मिरवणुक तर ९ वाजता शनि महाराजांचा अभिषेक , दुपारी १ वाजता घोडा – बैल टांगा शर्यती होईल तर लोकांच़्या मनोरजनासाठी रात्री ९ वाजता लोकनाटय तमाशा होईल . रविवार दि . ६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ हजेरी , दुपारी ४ वाजता हगामा होईल .

तरी शनि महाराज यात्रा उत्सावात आश्वी व परिसरातील भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रा. कान्हू गीते , दादाहरी गीते , भाऊसाहेब मुंढे , भास्कर गीते , गोकूळ गीते , सिताराम गीते , भिमराज गीते , मगन गीते , भाऊसाहेब सांगळे , बाजीराव गीते , बाळू बिडवे , विजय कदम , लक्ष्मण गीते , संतोष गीते , कैलास गीते , गोरख गीते , सावित्रा गीते , विठ्ठल दातीर , संजय बिडवे , साहेबराव गीते , सहादू मुंढे , बाळू दराडी , अनिल गीते , तान्हाजी गीते , बाळासहेब गीते आदीसह ग्रामस्थांनी केले .
