लोणी । झुंजार न्यूज

राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी शेवटच्या दिवशी बुधवारी फक्त २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रवरा शेतकरी मंडळाने निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दाखल झालेले सर्वच २१ उमेदवारी अर्ज विखे पाटील गटाचेच आहेत. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असून, या कारखान्यावर पुन्हा विखे पाटील यांचेच वर्चस्व असणार, हे स्पष्ट झाल्याने अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा सहकारात सहमती एक्सप्रेस धावली ! 

दरम्यान, दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची शुक्रवारी छाननी होणार आहे. २९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. याच दिवशी अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

सन १९५० मध्ये स्थापन झालेल्या आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी संचालकपदाची निवडणूक ९ मे २०२५ रोजी होणार आहे. त्यासाठी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती झालेली आहे.
राहाता येथील तहसील कार्यालयात ३ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. ९ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. २१ जार्गासाठी शेवटच्या दिवशीच २१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये विखे घराण्यातील फक्त डॉ. सुजय विखे पाटील यांच्या एकमेव अर्जाचा समावेश आहे.
विखे कारखान्यासाठी सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती सभासदांमार्फत १५ जण निवडून घायचे आहेत. यासाठी सहा गट निश्चित केले आहेत. पहिल्या गटातून ३. दुसरा, तिसरा व चौथ्या गटातून प्रत्येकी २ तर गट क्रमांक पाचमधून तीन व गट क्रमांक सहा मधून ३ संचालक निवडून द्यायचे आहेत. एकंदरीत सहा गांतून १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी १५ जांगांसाठी १५ अर्ज दाखल झाले आहेत.
हे सर्व अर्ज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाचेच आहेत. विरोधी प्रवरा शेतकरी मंडळाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मंडळाच्या वतीने एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही
संचालकपदासाठी दाखल अर्ज
सर्वसाधारण गट १:
विजय काशीनाथ म्हसे (आश्वी बु.),
रंगनाथ भाऊराव उंबरकर (उंबरी),
अनिल सावळेराम भोसले (आश्वी खुर्द),
गट २ : अशोक बाबासाहेब घोलप (हणमंतगाव),
गोरक्षनाथ सोपान तांबे (दाढ बुद्दक),
गट ३: किरण सुधाकर दिघे (धानोरे), प्रकाश लक्ष्ण ताठे (सात्रळ)
गट ४ : डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील (लोणी बु.), रामप्रसाद दगडू मगर (गोगलगाव),
गट ५ ज्ञानेश्वर रखूनाथ खर्डे (कोल्हार बु.). श्रीकांत दशरथ खर्डे (भगवतीपूर), बापूसाहेब चांगदेव कडसकर (भगवतीपूर), गट ६: विजय उत्तमराव कडू (तिसगाव), सोमनाथ बाळासाहेब गोरे (राजुरी), दिलीप मुक्ताराम यादव (ममदापूर),
अनुसूचित जाती रतन देवजी कदम (चिंचपूर),
ओबीसी सोपान विठ्ठल शिरसाठ (कोलहार खुर्द),
भजाविज (एनटी): बाळासाहेव चांगदेव लाटे (चिंचोली), उत्पादक सहकारी संस्था (ब वर्ग): सुनील भारत तांबे (दाढ बुद्रुक), महिला राखीव : अलकाताई संभाजी देवकर (कोल्हार बु.), हिराबाई भास्कर पाटोळे (चणेगाव).
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *