राज्यस्तरिय शोध निबंध स्पर्धेचे आयोजन , सहभागी होण्याचे आवाहन !
डॉ बाबासाहेबांच्या जयजयकारापेक्षा विचाराचे जागर करा : प्रा. अनिल मुन्तोंडे
आश्वी । झुंजार न्यूज
भगवान बुध्द , महामानव आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने महोत्सवाचे ध्वजारोहनाचे लोकनियुक्त संरपच सौ अलका गायकवाड यांच्या हस्ते उट्रघाटन करण्यात येवून जयंती साजरी करण्यात आली .

भगवान बुद्ध व विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जात असल्याचे समिती प्रमुख प्रा. अनिल मुन्तोंडे यांनी सांगितले यावर्षी राज्यातील सामाजिक विषयावर राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . राज्यासह इतर राज्यातील नामवंत संशोधक आश्वी येथे 12 मे 2025 बुद्धपौर्णिमा या सांगता प्रसंगी भेट देणार आहे.

प्रा. मुन्तोडे म्हणाले, ‘ केवळ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करा त्यासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावा’. या बाबासाहेबांच्या विचाराला आधार बनवून समिती वाटचाल करीत आहे. यासाठी सुमारे एक महिन्याचा महामानवाच्या विचारांचा जागर करण्याचा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने आखण्यात आला असून त्याची सुरुवात करण्यात आली.यासाठी आश्वी आणि परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले .तर माजी प्राचार्य विठ्ठल वर्पे यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून इतर गावांनी आपल्या जयंतीच्या पॅटर्नचे अनुकरण करावे असे आवाहन केले.

यावेळी डॉ विखे कारखान्याचे संचालक अनिल भोसले , बाबासाहेब भवर, सोपान सोनवणे, संजय भोसले, आशा मुन्तोडे, जगदीश मुन्तोडे,बापूसाहेब भवर,एकनाथ मुन्तोडे,संजय देशमुख, देविदास वाळेकर,संजय खरात,विकास गायकवाड. संतोष भडकवाड, भाऊसाहेब मुन्तोडे,बबन मुन्तोडे, भाऊसाहेब गाडे ,श्रीरंग कदम,कैलास पगारे,बंडू मुन्तोडे,कैलास मुन्तोडे , रावसाहेब मुन्तोडे,आकाश मुन्तोडे,सिद्धार्थ मुन्तोडे,अर्जुन मुन्तोडे गौरव,प्रतीक मुन्तोडे, मुन्तोडे,शकुंतला जाधव,अलिशा मुन्तोडे, वर्षा मुन्तोडे, संगिता मुन्तोडे, साधना मुन्तोडे ,रेणुका मुन्तोडे साक्षी मुन्तोडे, श्रेया मुन्तोडे उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुशिल मुन्तोडे यांनी केले तर प्रास्ताविक राजेंद्र मुन्तोंडे यांनी तर आभार बबन मुन्तोडे यांनी केले.
Post Views: 696
