दावल मलिक बाबा यात्रोत्सवा निमित्ताने


"ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील श्री दावल मलिक बाबा यात्रौत्सवास शनिवार पासून सुरुवात झाली असून रविवारी सायंकाळी ऑक्रेस्ट्रासह सोमवारी जादूगर शो तर मंगळवार दि. २२ मे २०२५ रोजी छत्रपती शिवरायांचे उपासक ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांचे हरिकिर्तन होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गोकूळ दिघे यांनी दिली आहे .

सालाबाद प्रमाणे दावल मलिक बाबाचा तीन दिवशीय यात्रोत्सव शनिवारसह , रविवार , सोमवार व मंगळवारी होत असून शनिवार दि.१९ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता.भव्य संदल मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी झाली तर रविवार दि. २० मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता.मयुरेश वाघ प्रस्तुत भव्य ऑक्रेस्ट्रा सोमवार दि. २१ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता. इंटरनॅशनल बाल जादूगर (रिया) यांचा मॅजिक शो , मंगळवार दि. २२ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता. अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे उपासक, कट्टर हिंदूत्ववादी ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांचे जाहिर हरिकिर्तन होणार आहे .

तरी दावल मलिक बाबा यात्रोत्सवा निमित्ताने होणाऱ्या तीन दिवशीय कार्यक्रम व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रोत्सव कमिटीने केले आहे .
