पाणी उशाला कोरड मात्र घशाला नुसार पाणी असतानाही निम्मा गावांतील महिलांना पाण्यासाठी पायपिट
श्रीरामपूर । झुंजार न्यूज
ज्या ठिकाणी नदी नसते त्या ठिकाणच्या नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. पण नदी काठी गाव असूनही त्या गावातील नागरिक जर पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत असतील तर? तेथे कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा अथवा आडमुठेपणा .हीच अवस्था श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गांवाची झाली असून प्रवरा कालवाच्या विळख्यात व पाणी पुरवठयाकरिता स्वतंत्र विहीरीला पाणी असताना गावाच्या केवळ दोन वार्डला पाणी का ? मिळते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे .

गेल्या अनेक दिवसापासून पाणी असताना ही पिण्याच्या पाण्यापासून वंचित अर्ध गांव वंचित असल्याचे तक्रारीवरुन दिसत आहे . पाणी पुरवठा करणारा कर्मचारी हा पन्नोनियुक्तीमुळे पचायत समिती येथे रुजू झाला या गोष्टीला वर्ष झाले असताना देखील नविन कर्मचारी भरण्यात आला नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाणी असताना ही पाणी टंचाई विदारक वास्तव समोर येवू लागली आहे.

प्रवरा कालव्याच्या विळख्यात असलेलं खंडाळा हे गाव हे अर्धा पेक्षा जास्त गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने ‘ पाणी उशाला कोरड घशाला’ अशी परिस्थिती या गावाची झाली आहे. शासनाकडून नागरिकाची तहान भागवण्यासाठी अनेक योजना आणल्या जात असून पालकमंत्री यांनी तालुकास्तरिय बैठका घेवून कोणी ही पाण्यापासून वंचित राहून यांची दक्षता घ्यावी अशी अधिकाऱ्यांना निर्देश दिले .

दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या गावात बोअरवेल , दोन विहिरी तसे पाणी साठवण तलाव व प्रवरा कालवा असताना केवळ ग्रामपचायतीच्या हलगर्जीपणामुळे अर्ध गाव उपाशी तर अर्धे गाव तुपाशी अशी आवस्था झाली असून लोकांची ऐन उन्हाळ्यात पाण्याकरिता भटकंती होताना दिसत आहे .

चार पाच दिवस उलटूनही अर्ध्या गावाला पाणी मिळेना म्हणून लोकांचं होणारे हाल व तक्रारी वरुन ग्रामसेवकांना याबाबत विचारणा केला असता संरपच , उपसंरपच व सदस्य निर्णय घेतील म्हणून हात वर करून काढा पाय घेतला तर पाणी पुरवठयाकरिता स्वतंत्र माणसाची नियुक्ती करावी यावर ठोस भूमिका घेतली जात नसून केवळ हलगर्जीपणाचा खेळ चालू असून ४ व ५ प्रभागात पाणी येते मग १,२, ३ प्रभागात पाणी का ? जात नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे
सौ मंजुषा ढोकचौळे ( सदस्य , ग्रा प . खंडाळा )
