शिबलापूर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे सोमवार दि. 21 मे 2025 रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर रि पा ई युवा तालुकाध्यक्ष योगेंश मुन्तोंडे यांनी दिली .

सदर होणाऱ्या जयंतीस रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , संपर्क प्रमुख श्रीकात भालेराव , माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील , रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत- गाजत भव्य मिरवणुक सायंकाळी 5 वाजता होणार आहे . तर 8 वाजता जयंती निमित्ताने सभा , 9 वाजता स्नेहभोजन व 10 वाजता संगमनेर भूषण तथा गायक अविनाश कदम यांचा नृत्यंगनासह ऑक्रेष्ट्रा होणार आहे .

तरी शिबलापूर व परिसरातील लोकांनी , तरुणांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
