आ अमोल खताळ यांच्या हस्ते भगवती चाकुरमाता देवीची महाआरती
संगमनेर । झुंजार न्यूज
ज्या भगवती चाकूरबाई मातेच्या कृपा आशीर्वादाने मला या तालुक्याचे लोक प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्या माध्यमातून आमदार झाल्या नंतर सर्वप्रथम आपण या देवीच्या सुशोभीकरणासाठी ९ लाख ९० हजार रुपये तसेच शाळेच्या दुरुस्तीसाठी अडीच लाख रुपये असा एकूण साडेबारा लाख रुपयाचा निधी एकट्या डेरेवाडीसाठी दिला आहे भविष्यात सुद्धा या वाडीच्या विकासासाठी भरीव निधी देणार अस ल्याचा विश्वास आ. अमोल खताळ यांनी व्यक्त केला
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावांतर्गत येत असणाऱ्या डेरेवाडीच्या भगवती चाकूरबाईमाता यात्राउत्सवाच्या निमित्ताने निमित्त महाआरती आ अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस श्रीराज डेरे धांदरफळ येथील रामेश्वर पतसंस्थेचे चेअरमन रोहिदास डेरे भाऊसाहेब डेरे, प्रदीप डेरे पुंजा डेरे सोमनाथ डेरे कमलेश डेरे सागर डेरे महेश बो-हांडे संदीप डेरे मंगेश डेरे प्रवीण डेरे विनोद डेरे गणेश डेरे बाबासाहेब डेरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ खताळ म्हणाले की भगवती चाकूर बाई माता यात्रोउत्सवाच्यानिमित्ताने सुरू असणाऱ्या संगीत आखाडीची परंपरा या गावातील तरुणांनी कायमस्वरूपी जपली आहे. आमदार झाल्यानंतर सर्वात पहिला निधी या मंदिराच्या शोभीकरणासाठी दिला आहे. त्या निधीतून या मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम आपल्या सर्वांच्या सहमतीन लवकरच सुरू केले जाणार आहे.गाव छोटे आहे की मोठे आहे याचा मी कधीही विचार करत नाही ज्यागावाचा अगर वाडीचा चाळीस वर्षापासून विकास झाला नाही त्या गावाचा आणि वाडीचा सर्वांगीन विकास करण्याचा माझा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले
अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात यावी अशी मागणी रोहिदास डेरे श्रीराज डेरे भाऊसाहेब डेरे यांनी आ अमोल खताळ यांच्याकडे केली यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड झालेले ऋषिकेश एकनाथ डेरे यांचा तर रिलस्टार आदित्य संभाजी डेरे यांचा आ. अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
सौ खताळ यांनी घेतले भगवती चाकुर मातेचे दर्शन
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावांतर्गत येणाऱ्या डेरेवाडी येथील भगवती चाकूरमाता यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलम खताळ यांनी ही दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले
