{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

आश्वी । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकिय दृष्टया प्रतिठिष्ठ असणाऱ्या व वयोवृध्द , महिला , पुरुष व तरुणासह दोन वाड्या – वस्त्यासह  साडेतीन हजार लोकसंख्येच्या पानोडी गावात खाजगी डॉक्टरविना प्राथमिक आरोग्य केंद्र असून ही डॉक्टर , आरोग्य सेविका , आरोग्य सेवक नसल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे रुग्णांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहे. तर नियुक्त असणारा डॉक्टर “कभी गम , कभी खुशीमें ” नुसार मर्जी नुसार आओ जावो घर तुम्हारा प्रमाणे प्राथ आरोग्य केंद्रात असल्याचे आढळून येत असल्याने अशा डॉक्टरांची गावांला गरज नसून त्याची त्वरीत चौकशी होवून त्याची हाकलपट्टी करावी अशी मागणी होत आहे .
Oplus_131072
येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून ही नसल्यासारखे असल्याने रुग्णांची गैरसोय होत असून संध्या कालखंडात सुगर , बी पी , हदयविकार , गुडघे दु :खी , पाय दुःखी , ताप , सर्दी असे अनेक छोटे – मोठे आजारच्या ग्रस्तांनी लोक वैतागलेले असून या उपचाराकरिता लोकांनी रात्री – अपरात्री ६ कि मीच्या अंतरावर जावे लागत असल्याने शासनाने उपलब्ध केलेल्या या प्राथमिक उपकेंद्राचा का ? उपयोग अशी चर्चा होताना दिसत आहे . 
Oplus_131072
तर येथे वैद्यकीय अधिकारी हा कायम स्वरुपाचा असताना तो केवळ आठवडयातून एकचं दिवस आढळून येत आहे इतर कालावधी आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त दिसत आहे आहे . तर कामाचा ताण पडल्यास मदतनीस , आशा सेविकांवर राग व्यक्त करून आरेरावी भाषा वापरुन दम देण्याचा प्रयत्न करत आहे . तर  पानोडी गाव परिसरातील तसेच वाड्या-वस्त्यांवरील दररोज सरासरी ३० ते ३५ गोर गरिब रुग्ण उपकेंद्रात येतात मात्र डॉक्टरचं उपलब्ध होत नसल्याने रुग्ण हे निराश होवून एखादया खाजगी दुकानातून गोळी घेवून दिवस घालवितात त्यांचा परिणाम हा मोठ्या आचारातून होताना दिसत आहे . महीन्याच्या कालावधीतच अनेक चालता – फिरता रुग्ण हदय विकाराने दगावल्याचे दिसून आले आहे .
Oplus_131072
गेल्या अनेक दिवसापासून या सुंदरश्या इमारती आरोग्यसेवक ,  सेविका नसून केवळ येथील आरोग्याचा सर्व भार ह्या आशा सेविकाचं साभाळत आहे तर एक डॉक्टर नसून नसल्यासारखा आहे त्या डॉक्टरच्या लहरीपणामुळे गावातील रुग्णांना आश्वी सारख्या दुरवरच्या गावात जावा लागते त्यामुळे लवकर ग्रामसभा घेवून अशा निस्क्रीय लोक नको त्यांची बदली व्हावी अशा मागणीचा ठराव करण्यात येणार आहे .
गणपतराव हजारे ( संरपच , पानोडी ग्रा प )
Oplus_131072

डॉक्टर आहेत का हो? आरोग्य केंद्रात आल्यानंतर डॉक्टर आहे का हो? अशी केवीलवाणी चौकशी रुग्ण करताना आढळतात. परिसरातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, रात्री-अपरात्री त्यांना शेतात जावे लागते. त्यावेळी काही दुखापत किंवा सर्पदंश यासारखे प्रकार घडल्यास रात्रीच्या वेळी जायचे कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे” असून या उपकेंद्रात कुठल्या प्रकारे गोळ्या , औषधे मिळत नाही , कुठल्या प्रकारचे मशनरी उपलब्ध नाही , अशा डॉक्टरचा व उपकेंद्राचा काय १ उपयोग !

Oplus_131072
प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या माध्यमातून बुधवारी सर्व रोगनिदान मोफत शिबिर घेण्यात आले या शिबिरात ४० ते ५० गोरगरिब लोकांनी आपला सहभाग नोंदविल्याने उपस्थितीत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असताना एवढ्या मोठया प्रमाणात लोकांच्या सहभागाचे आश्चर्य व्यक्त केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed