मुंबई । झुंजार न्यूज
लोकांना पक्क घर मिळालं पाहिजे यासाठी रिपब्लिकन पक्षाने आंदोलन केले आहे आणि त्या मुळेच एस आर ए स्कीम रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनामुळे सुरू झालेली आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी टाटा पावर रुपवते नगर मागाठाणे बोरवली मुंबई येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती निमित्ताने ना. रामदासजी आठवले बोलत होते.
.
आम्ही गोरगरिबाचं नाव घेऊन या ठिकाणी चळवळ चालवली आहे या लोकांच्या ताकतीवर आम्ही इथे उभे राहिलो आहे ही ताकद आम्हाला उभी करायची आहे. आणि ह्या ठिकाणच्या जागा तुटल्या तर आम्हाला पर्यायी जागा मिळाली पाहिजे पर्यायी आमची व्यवस्था झाली पाहिजे तसे एम एम आर डी ला पत्र लिहिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पण बोलणार आहे जो रस्ता प्लॅन मध्ये आहे तो रस्ता बदलण्याचा पण प्रयत्न आपण करूया रस्ता वस्तीवरून न जाता बाजूने जाईल का? जर जात नसेल तर पर्यायी घर मिळाले पाहिजे आणि ही जिम्मेदारी एम एम आर डी वर आहे त्यामुळे नक्की आपणास न्याय मिळेल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड वरिष्ठ नेते कमलेश यादव हरिहर यादव सूर्यकांत बराटे मधुकर गवई अँड.अभयाताई सोनवणे मुंबई अध्यक्षा उषाताई रामलू हरिभाऊ कोंडे प्रकाश लगाडे आरती लगाडे आदी मान्यवर उपस्थित होते
