पानोडी । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील श्री शंकराचार्य जयंती निमित्ताने जागृत देवस्थान असणारे महादेव यात्रा शुक्रवार दि. २ मे २०२५ व शनिवार दि. ३मे २०२५ रोजी दोन दिवशीय होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीनी दिली आहे .
सालाबाद प्रमाणे अक्षय तृतीयाच्या तिसऱ्या दिवशी पानोडी गावाची महादेव यात्रा होत असते हे देवस्थान ओढया लगत असून या यात्रेला फार महत्व असल्याने मोठी गर्दीचे स्वरुप राहते . शुक्रवार दि. २ मे रोजी सकाळी पुजा होवून भजने होतात त्यानंतर सायंकाळी वाजत गाजत व फटाक्याची अतिबाजीतून कावडीची मिरवणुक होवून संध्याकाळी लोकांच्या मनोरंजनासाठी नंदाताई पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा होत आहे .
शनिवारी ३ मे रोजी सकाळी ९ वाजता हजऱ्या तर ४ वाजता हगामा होणार आहे तर पानोडी व परिसरातील भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रावसाहेब घुगे , सूर्यभान थोरात , भाऊसाहेब चव्हाण , रामनाथ पवार , विठ्ठल घोडेकर , संजय जाधव , हौशाभाऊ जाधव आदीसह यात्रा कमिटीने केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *