सुनबाई चा सार्थ अभिमान- ॲँड.शाळीग्राम होडगर

 

 

 

आश्वी । झुंजार न्यूज

 

 

डॉ रुचिरा दिग्विजयसिंह होडगर या वैद्यकीय क्षेत्रातील अतिउच्च पदवी उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आहे कालच त्यांच्या परीक्षेचा निकाल लागला मांचीहिल परिवार व होडगर परिवारासाठी ही अतिशय आनंदाची घटना आहे

 

 

 

ॲड. शाळीग्राम होडगर यांचे चिरंजीव दिग्विजयसिंह शालीग्राम होडगर यांच्या त्या सुविद्य पत्नी होत होडगर परिवारात एकूण सहा उच्च पदवीधारक डॉक्टर कार्यरत आहे ही जमेची बाजू आहे डॉक्टर रुचिरा ताई यांचे माहेर कलकत्ता चे भट्टाचार्य कुटुंब हे शैक्षणिक दृष्ट्या अतिशय प्रगत कुटुंब आहे त्याचबरोबर विविध क्षेत्रात त्यांच्या पूर्वजांनी भरीव असे समाज उपयोगी काम केलेले आहे रुचिरा ताईंचे आजोबा जितेंद्र कुमार भट्टाचार्य हे कलकत्ता हायकोर्टाचे न्यायधीश होते त्याचबरोबर त्यांचे पंजोबा राजेंद्रकुमार भट्टाचार्य हे कलकत्ता उच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता होते तसेच ते कलकत्ता हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष होते रुचिरा ताईंच्या आईकडील आजोबा शैलेंद्रनाथ हलदार हे कलकत्ता येथील सुप्रसिद्ध कालीघाट मंदिराचे मुख्य सेवायत होते तर रुचिता ताईंचे मामा स्वरूप कुमार हे केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभागात वरिष्ठ व्यवस्थापक होते तसेच रुचिरा ताई च्या बहिणीचे पती हे आज रोजी भारतीय लष्करात कर्नल म्हणून कार्यरत आहे

 

 

 

अशा शिक्षण व संस्कार सिद्ध असलेल्या कुटुंबाचा वारसा डॉक्टर रुचिराताई यांना लाभला त्यामुळे डॉक्टर रुचिताताई यांचे पुढील जीवन हे विशेषतः कॅन्सर रुग्णांसाठी अतिशय फलद्रूप ठरेल यात शंका नाही
डॉक्टर रुचिरा ताई यांनी एमबीबीएस या पदवीनंतर एम एस सर्जन ही पदवी जे .जे. हॉस्पिटल मुंबई येथे पूर्ण केले त्यानंतर डॉक्टर एन बी (अंकोलॉजी सर्जन) ही पदवी टाटा हॉस्पिटल कलकत्ता येथून नुकतीच पूर्ण केलेली आहे कॅन्सर सारख्या दूरधर आजारांवर त्यांनी ही अतिउच्च पदवी घेतल्याने अनेक कॅन्सर रुग्णांना त्यांच्या हातून दिलासा मिळणार आहे खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्र हे मुळातच हुशार मुलांसाठीचे क्षेत्र आहे एमबीबीएस हा चार वर्षाचा कोर्स झाल्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठी तीन वर्ष खडतर अभ्यास करावा लागतो त्याचप्रमाणे डॉक्टर एन बी या पदवीसाठी पुन्हा तीन वर्षाचा कालावधी आहे असा एकूण दहा वर्षाचा मोठा कालखंड हा अभ्यास आणि तणाव हे दिव्य पार करावे लागते डॉक्टर रुचिरा ताई यांनी हा कठोर शिक्षणाचा मार्ग आजवर खूप खडतर परिश्रम घेऊन पूर्ण केला आहे

 

 

योगायोगाने होडगर परिवारातील डॉक्टर दिग्विजयसिंह शाळीग्राम होडगर यांनी देखील एमडी मेडिसिन नंतर डॉक्टर .एन . बी . (गॅस्ट्रो ) ही पदवी नुकती संपादन केली आहे त्यामुळे दोघेही उभयतांना वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशलिटी या पदव्या मिळवल्या आहेत

 

 

डॉक्टर रुचिरा ताई यांच्यासारखे जिल्ह्यामध्ये डॉक्टर एन बी (अं ॲन्कोलॉजी सर्जन )डिग्री मिळवणारे एक दोन डॉक्टर असतील त्यामुळे डॉक्टर रुचिरा या कॅन्सर पेशंटला उपचारासाठी जवळच उपलब्ध झालेल्या आहेत त्यांच्या हातून कॅन्सर पेशंटची सेवा घडो ही प्रार्थना
डॉक्टर रुचिराताई यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच युवा नेते मा. खा . डॉ .सुजय दादा विखे पाटील त्याचप्रमाणे सौ शालिनीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed