कारखान्याच्या फायर फायटर च्या माध्यमातून बसस्थानक परिसराची स्वच्छता

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा मा. महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्यातून संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हायटेक बस स्थानक उभे आहे. या बसस्थानकात सर्व अत्याधुनिक सुविधा असून महाराष्ट्रातील आदर्शवत असलेल्या या बसस्थानकाची स्वच्छता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या मदतीने केल्याने हा परिसर स्वच्छ झाला आहे.

 

 

 

Oplus_131072

संगमनेर बस स्थानक हे शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण आहे. प्रवाशांची या ठिकाणी सातत्याने मोठी वर्दळ असते. या सर्व प्रवाशांना चांगली सुविधा व्हावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत अत्याधुनिक बस स्थानक निर्माण केले आहे.हे बस स्थानक म्हणजे संगमनेर एअरपोर्ट असा याचा अभिमानाने सर्वजण उल्लेख करतात.सर्व सुविधा, त्याचप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्स असल्याने बस स्थानक परिसरात तालुक्यातून व शहरातून आलेल्या नागरिकांचा मोठा वावर असतो.

 

 

 

Oplus_131072

बस स्थानकाचा परिसर मोठा असल्याने नागरिकांच्या वरदळी मधून या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. येणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रसन्न वातावरण मिळावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या फायर उपलब्ध करून देण्यात आले.

 

 

Oplus_131072

या माध्यमातून सर्व बस स्थानक परिसर धुवून स्वच्छ करण्यात आला. प्रवाशांसाठी अत्यंत प्रसन्न व स्वच्छ वातावरण या ठिकाणी निर्माण झाले.

 

 

Oplus_131072

.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम तालुक्याच्या व शहराच्या विविध कामांमध्ये मोठी मदत केली आहे.

 

 

 

Oplus_131072

.
कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या फायर फायटर मधून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला असून या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याने सर्व प्रवासी व नागरिकांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय यांचे अभिनंदन केले आहे

 

 

 

Oplus_131072


कारखान्याकडून स्वच्छतेसाठी मदतीचे काम

 

संगमनेर हायटेक बस स्थानकाचा परिसर मोठा असून नागरिकांची मोठी संख्या या ठिकाणी असते. सर्व चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असते. या परिसराच्या स्वच्छतेसाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी येथे येऊन सर्व परिसर धुवून साफ करण्यास मोठी मदत केली आहे. हा एक सामाजिक उपक्रमातून यामधील सहभागाबद्दल आम्ही कारखाना प्रशासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो

 

प्रशांत गुंड पाटील
आगार प्रमुख, संगमनेर बस स्थानक

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed