संगमनेर । झुंजार न्यूज

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळ, अमृतनगर संचालित सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्याभवन या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाने सातत्याने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.

Oplus_131072
या निकाला विषयी माहिती देताना मुख्याध्यापिका श्रीमती संगीता म्हस्के व कार्याध्यक्ष तांबडे म्हणाले की,  माजी शिक्षण मंत्री तथा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्या भवन या विद्यालयाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यात  चि. यशवर्धन सोमनाथ सोनवणे यांने 89.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे, द्वितीय क्रमांक कु. सायली सुरेश भडांगे 88.20%, तृतीय क्रमांक , कु. भक्ती मारुती सोनवणे 84.20%, चतुर्थ क्रमांक चि. साईज संजय आळनर 83.20% व पाचवा क्रमांक कु. सदिच्छा दत्तात्रय बोरसे 82% गुण मिळवून मिळवला आहे.

Oplus_131072
विद्यालयात अद्यावत सुसज्ज ग्रंथालय भव्य क्रीडांगण अनुभवी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी होणारे सातत्याने उपक्रम यामुळे या विद्यालयाने मोठी गुणवत्ता राखली आहे या विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.

Oplus_131072

 

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती संगीता मस्के ,याचबरोबर शिक्षक राजू बड, उत्तम गवांदे ,जैनुद्दीन तांबोळी, इंद्रभान शिंदे व दीपक आदमाने तसेच प्राथमिक विद्याभवन चे सर्व शिक्षक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Oplus_131072
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे,आ. सत्यजित तांबे, कारखान्याचे व्हा चेअरमन पांडुरंग पा. घुले, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ जयश्रीताई थोरात,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अमृत सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष रामदास तांबडे, सेक्रेटरी संदीप दिघे, खजिनदार भारत देशमुख, सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed