आश्वी । झुंजार न्यूज
मराठा साम्राज्याचे शूर आणि शूर योद्धा संभाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस श्रद्धेने आणि अभिमानाने भरलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते तर ते धार्मिक सहिष्णुता, विद्वत्ता आणि शौर्याचे प्रतीक असल्याचे मत केतन लव्हाटे यांनी मांडले .

संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथे शिवस्वराज्य सेवाभावी संस्थेच्या वतीने मे २०२५ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने १५ मैल फाटा लव्हाटे वरती ते चिंचपूर , ८ मोरी रस्ता व दुर्गापूर रस्ता , मळाई रस्ता व बिरोबा रस्ता , हरणधोंडाई रस्ता व निमगाव रस्ता , कोंबडवाडी रस्ता व १४ मैल रस्ता आदीसह संपूर्ण गावातून छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणुक काढण्यात आली .
यावेळी शिव स्वराज्य सेवाभावी संस्थेचे आयोजक शिवस्वराज्य सेवाभावी संस्था पोलिस इन्स्पेक्टर दीपक दादा बर्डे , प्रवर्तक अध्यक्ष केतन लव्हाटे , अध्यक्ष अविनाश तांबे , उपाध्यक्ष किरण थेटे ,माजी सरपंच अरुण जबाजी लव्हाटे , श्रीमती मंदाताई अरुण लव्हाटे ,श्रीमती स्वातीताई केतन लव्हाटे , श्रीमती वैशालीताई अविनाश तांबे , सिस्टर लताताई गायकवाड , नलिनीताई शंकर लव्हाटे ,श्रीमती लीलाबाई लक्ष्मण थेटे , पोलिस पाटील दत्तू तांबे , पोलिस पाटील अशोक थेटे , सरपंच सागर तांबे , माजी सरपंच विवेक तांबे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
