पाथरे । झुंजार न्यूज

 

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु येथील एस. एस. सी. परीक्षा व एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रु./मार्च २०२५ चा निकाल नुकताच जाहीर असून इयत्ता १० वी चा निकाल ९२.८५ % लागला आहे.

 

 

 

Oplus_131072

प्रथम क्रमांक घोलप श्रुती सत्यजित ८१.०० % व ब्राह्मणे केतन विलास ८१.०० % द्वितीय क्रमांक राक्षे ओंकार बाळासाहेब ८०.८० % तृतीय क्रमांक घोलप चैतन्य प्रमोद ८०.०० % क्रमांक पटकाविला आहे. तर इयत्ता १२ वी विज्ञान विभागाचा शेकडा निकाल ९८.७४ टक्के, कला विभागाचा शेकडा निकाल ८१.०८ टक्के व वाणिज्य विभागाचा शेकडा निकाल ९२.३० टक्के लागला आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण २६५ विद्यार्थी पैकी २४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ९३.५८ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत प्रथम कु. खर्डे आरुषी आनंद ८३.३३% द्वितीय चि. जोर्वेकर सार्थक गणेश ७२.३३% व कु. लोणकर गौरी संतोष ७१.००.% यांनी प्रविण्य मिळविले असून कला शाखेत प्रथम चि. उजागरे प्रतिक संतोष ५५.८३% द्वितीय कु . सांगळे ज्ञानेश्वरी आप्पासाहेब ५२.८३% तृतीय कु. घोलवड पूजा दत्तू ५१.८३ %.क्रमांक पटकाविला आहे, वाणिज्य शाखेत प्रथम कु. कापसे पूजा गिताराम ६७.८३% द्वितीय चि. जोरवेकर दर्शन विकास ६३.६७ % तृतीय कु. यादव अनुराधा अमरनाथ ६१.००% अनुक्रमे प्राविण्य मिळविले .

 

 

 

Oplus_131072

यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, अहिल्यानगर दक्षिणचे मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील .सचिव भारत घोगरे पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे , स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष श्री. आबासाहेब पा. घोलप, सरपंच श्री. उमेश पा.घोलप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब पा. कडू महाविद्यालयाचे प्राचार्य के बी बारगुजे सर उपप्राचार्य वाणी मॅडम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ घुगे सर श्री आण्णासाहेब तांबे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. संदीप म्हस्के सर आदींसह सर्व प्राध्यापक व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed