निळवंडेतून कालव्याद्रारे गाव तळयात आलेल्या पाण्याचे पूजन विविध विकास कामाचे भूमीपूजन !
शिबलापूर | झुंजार न्यूज
पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन डॉ सुजय विखे पाटील हे शुक्रवारी दुपारी शिबलापूर व परिसराच्या दौऱ्यावर येत असून शिबलापूर येथील विज वितरणाचे नविन सबस्टेशन भूमीपूजन , भैरवनाथ सुशोभीकरण उट्रघाटन व शिबलापूरसह परिसरात विविध गाव तलावात निळवंडे च्या आलेल्या पाणी पूजन होणार असल्याची माहिती शिबलापूर प्रभारी संरपच सुनिल मुन्तोंडे यांनी दिली .

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शिबलापूर , आश्वी , पिंप्री लौकी अजमपूर , पानोडी हे विखे पाटील यांचा बाल्लेकिल्ला असून या गांवाना निळवंडे च्या कालव्याद्रारे आलेल्या पाण्याचा मोठा फायदा होत आहे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेचं निळवंडयातून पाणी सोडण्यात आले ते पाणी प्रत्येक गावांनी आपल्या ओढे – नाले , गाव तळे आदी ठिकाणी सोडले . त्यामुळे परिसर आता पाणीमय झाल्याचे दिसून येत आहे .

या पाणीमय झालेल्या गाव तलावाचे पाणीपूजन व शिबलापूर येथील वीज वितरण कंपनीचे नूतन सबस्टेशनचे भूमीपूजन व विविध विकास कामाचे उट्रघाटन डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दि ३० मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
