आश्वी | झुंजार न्यूज
आश्वी येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील भंडारी यांची उच्च पदवीधर कन्या प्रतिक्षा हिने ९जुन २०२४ रोजी उपाध्या प्रवर परम पुज्य श्री प्रवीण ॠषीजी महाराज, तीर्थश ॠषीजी महाराज जैन साध्वी सन्मतीजी महाराज, साध्वी सुनंदाजी महाराज यांच्या उपस्थितीत खडतर असे जैन साधुव्रताचा स्वीकार करत जैन साध्वी मोक्षदाजी महाराज झाल्या त्यांच्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून उडाण टिम आश्वी व शांतीनाथ सेवा संस्थान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन शनिवार दिनांक ७ जून २०२५ रोजी केले होते .

या शिबिराचा १२० रुग्णांनी लाभ घेतला तर एक्सपर्ट डेंटल क्लिनिक व उडान टिम च्या संयुक्त विद्यमाने
मोफत दंत तपासणी शिबीर रविवार दिनांक ८ जुन रोजी संपन्न झाले या शिबिरात डॉ. सागर गोपाळे आणि डॉ. राधिका चोपडा यांनी अत्याधुनिक अश्या एआय रोबोट मशीनचा साह्याने पन्नास रूगणांची तपासणी करुन उपचार केले. शिबीराचे उदघाटन भाऊराव कांगुणे,जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी यांनी केले. सोमवारी जैन धर्म स्थानक आश्वी व घोडनदी पुणे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीर यशस्वी करण्यासाठी भुषण भंडारी,अथर्व रातडीया,रोशन रातडीया,प्रीत गांधी,कोमल बोरा,महीमा रातडीया,प्राप्ती मुनोत, प्रसन्ना रातडीया,अमिता भंडारी,सिया गांधी, दिया लुंकड, जिनेशा गांधी, सलोनी पटवा शेलोत,साक्षी पटवा,जान्हवी कोळपकर, भक्ती भंडारी,लब्धी गांधी,साक्षी पटवा,तिलक गांधी,अनिकेत पटवा,आनंद चोपडा,यश भंडारी ,सनी भंडारी उडान टीम आश्वी ने प्रयत्न केले.
