संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील आदिवासी महिलेच्या खून आणि कोकणगाव येथील युवक गणेश भिवा पवार याच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशी होवून त्यांना न्याय मिळावा या हेतूने संगमनेर शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मंगळवार दि 17 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता सर्व पक्षीय भव्य मोर्चा व रस्तारोको आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपाई ( आठवले ) तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली .

कर्जुले पठार येथील आदिवाशी समाज्यातील रुपाली वाघ ही शेजारील शेतात शौचालयास गेली होती या किरकोळ कारणावरुन शेती मालक व वाघ कुटुबांत वाद झाला वादाचे पडसाद हानामारीवर होवून रुपाली वाघ वर शेती मालकांने चाकूने हल्ला केला या हल्लात जखमी झालेल्या रुपालीला संगमनेर येथील हॉस्पीटल घेवून जाण्यात आले मात्र डॉक्टरांच्या दरगांईमुळे रुपाली वाघ यांचा मृत्यु झाला तर कोकणगांव येथील गणेश पवार याला ही मागील वादाचा राग मनात ठेवून त्यांचा ही घातपात करण्यात आल्याची शंका असल्याने या दोन्ही आदिवाशी व्यक्ती न्याय मिळवून देण्याकरिता संगमनेर विश्रामगृह येथे विविध पक्षीय व संघटनेची बैठक होवून मंगळवार दि 17 जून2025 रोजी सकाळी 11 वाजता संगमनेर शहरातील असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर भव्य मोर्चा व रस्ता रोको आंदोलन होणार आहें .
या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, आदिवासी, दलित व मागासवर्गीय संघटना सहभागी होणार असून सतत होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *