शौचालयावरुन आदिवाशी महिलेचा खून होत असेल तर ग्रामसेवक , बी डी ओ व सरकारला सुध्दा जबाबदार धरावे : शिवाजीराव ढवळे
८ दिवसात न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार : सुरेंद्र थोरात
संगमनेर l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील आदिवासी महिलेच्या हत्ये प्रकरणी वाढीव कलमे लावावी, पैशा अभावी उपचार नाकारणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करा,आरोपींना फाशी द्या, अत्याचारीत कुटुंबाला धमकावणार्याचा बंदोबस्त करा. तसेच कोकणगाव येथील युवकांच्या घटनेबाबत खुणाचा गुन्हा दाखल करा विविध मागण्यांसाठी रिपाई पक्षासह आदिवासी व मागासवर्गीय संघटनाच्या वतीने मंगळवारी (दि.१७) निषेध मोर्चा काढण्यात आला.

शेतात महिला शौचालयाला गेल्याच्या किरकोळ कारणावरून कर्जुले पठार येथे महिलेची हत्या करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर शहरातील बस स्थानकासमोरील महामार्गावर मंगळवारी दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रिपाईसह विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. येथून मोर्चा काढत हे सर्व कार्यकर्ते बस स्थानकासमोर आले. यावेळी युवकांनी या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या रास्ता रोकोच्या वेळी सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना कर्जुले पठार येथील घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंचावर देखील अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करावा, जखमी महिलेला उपचार नाकारणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कारवाई करा, या घटनेतील गुन्ह्याबाबत वाढीव कलमे लावा, कर्जुले पठार गावात अन्यायग्रस्त कुटुंबाला त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करा, या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी,

तालुक्यात मागासवर्गीय कार्यकर्त्यांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने कारवाई करा, तसेच कोकणगाव येथील युवकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. तर काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आजी-माजी आमदार या घटनेबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली. तर पालकमंत्रीही या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

कर्जुले पठार येथील घटनेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेवून यापुढे कुठल्याही आदिवासी अथवा मागासवर्गीय समाजावर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईलअसा इशारा देण्यात आला. या आंदोलनात एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे , रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , सामाजिक कार्यकर्ते संतोष रोहम , विद्रोही संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बर्डे , रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , रिपाई शहराध्यक्ष कैलास कासार , एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे ., दलित पॅंथरचे राजु खरात, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, मनसे तालुकाध्यक्ष योगेश सुर्यवंशी , प्रदिप थोरात , रिपाई युवा जिल्हाध्यक्ष प्रदिप बनसोडे , विजय खरात , मंजाबापू साळवे , आकाश गोडगे , आनंद केदार , देवीदास माळी , लक्ष्मण साठे , माणिक यादव , कुंदन माळी , किरण रोहम , विकास जाधव , शशीकांत दारोळे , योगेश मुन्तोंडे , वंचित बहुजन आघाडीचे अजिज ओहरा , वैभव मोकळ , मधुकर सोनवणे , बाळासाहेब कदम , नानासाहेब कदम , राम दारोळे , भाऊसाहेब माळी , सिध्दार्थ खरात , बाळासाहेब पवार , पोपट मेंगाळ , संपत भोसले , सागर शिंदे , विशाल वैराळ , योगेश कर्डक , राम शिरडकर , रुपेश राऊत , बाळासाहेब दरेकर , अनिल जाधव , शहनवाज बेगमपुरे , गणीभाई मोमिन रुपाली सोनवणे , पुनम माळी , मंदा पवार , गोविंद सोनवणे, अवि सोनवणे , मच्छिंद्र पवार, प्रकाश पवार, लक्ष्मण पवार आदीसह मोठया संख्येने दलित , आदिवाशी कार्यकर्ते , महिला युवक उपस्थित होते . पोलीस उपाधिक्षक डॉ कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी यावेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे दीड तास रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले.

रस्ता रोको आंदोलनाचे सुत्रसंचालन रिपाई तालुकाध्यक्ष अशिष शेळके यांनी केले .

आज ही ९० ते ८५ टक्के आदिवाशी समाज हा दारिद्रयाखालील खचपडत असून त्यांना स्वतः चे शौचालय , घर , जमीन नाही साधे रेशन धान्य सुध्दा मिळत नाही हे दुर्दवी बाब असून शौचालयावरुन जर महिलेचा खून होत होत असेल तर अशा निर्दयी लोकांना फाशीचं दया तर ग्रामसेवक , बी डी ओ व सरकारला सुध्दा सहआरोपी करा जर यांनी शौचालय दिले असते तर ही घटनाचं घडली नसती
शिवाजीराव ढवळे ( अध्यक्ष , एकलव्य संघटना )

कर्जुले पठार व कोकणगांव मधील झालेल्या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून आरोपीवर तातडीने कारवाई करावी अन्यथा हे आंदोलन शांतते आहे पुढील आंदोलने हे तालुक्या तालुक्या , जिल्हयात , राज्यात होतील याला जबाबदार येथील पोलिस यंत्रणा असेल
सुरेंद्र थोरात ( जिल्हाध्यक्ष , रिपाई अहिल्यानगर )

नवीन नगर रोड, बस स्थानक समोरील महामार्गावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जुले पठार येथील महिलेच्या हत्ये प्रकरणी विविध संघटनांच्या पदाधिका कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत पोलीस प्रशासन, खाजगी रुग्णालय तसेच आजी-माजी आमदाराविरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
