संगमनेर | झुंजार न्यूज
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्या नगर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री ना.फ़ॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, बस स्थानक परिसरा तील दत्त मंदिरात येथे पवित्र धार्मिक विधी कार्यक्रमांचे संगमनेर शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधींना आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी सपत्नीक उपस्थित राहून मंत्री विखे यांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी महारुद्र याग करून मनो भावे प्रार्थना केली

दत्त मंदिरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त महायुतीच्या वतीने आ.अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या शुभ हस्ते रुद्र याग, मार्कंडेय आराधना, सप्त चिरंजीव व नक्षत्र देवता पूजन, हवन व आशीर्वाद मंत्रपठण हे सर्व धार्मिक विधी भक्तिभावाने करण्यात आले

पुरोहित संघाचे अध्यक्ष. भाऊ जाखडी व त्यांच्या सहकारी ब्रह्मवृंद यांनी मंत्रोच्चारांद्वारे संपूर्ण परिसर पवित्रतेने भारावून टाकला होता. त्यांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने झाले ल्या विधीमुळे परिसरात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी सौरभ देशमुख महिला अध्यक्षा दिपाली वाव्हळ भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ रामभाऊ जाजू सिताराम मोहरिकर भगवान गीते डॉ सोमनाथ कानवडे भारत गवळी भाजप शहराध्यक्ष पायल ताजने रेखा गलांडे रोहित चौधरी गणेश सानप राहुल भोईर शशांक नामन वरद बागुल ऋषिकेश मुळे अक्षय वर्पे भैय्या सातपुते अनेक मान्यवर पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांनी आपली निष्ठा आणि प्रेमाने मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांप्रती असलेला सन्मान व्यक्त केला. उपस्थित सर्वांनी साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, व समाजहितासाठी यशस्वी कार्य चालू राहो, ही प्रार्थना केली.
