आश्वी । झुंजार न्यूज

 

 

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रवीण इल्हे यांची बदली त्वरित रद्द करा अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेत देण्यात आला

 

 

 

Oplus_131072

 

आश्वी खुर्द ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा संरपच सौ.अलकाताई बापुसाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

 

 

 

Oplus_131072

यावेळी उपसरपंच बाबा भवर सदस्य संजय भोसले सोपान सोनवणे सागर भडकवाड प्रवरा बँकेचे संचालक बापुसाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड विलास गायकवाड राजेंद्र सोनवणे दगडु गायकवाड सौ.शोभना सोनवणे सह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते
एनवेळीच्या विषयावर चर्चा सुरु झाली असता मा.ग्रा.प.सदस्य संतोष भडकवाड ग्रामपंचायत अधिकारी प्रविण इल्हे यांची बदली त्वरित रद करावी असा ठराव मांडला असता सर्व महिला व उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा दिला

 

 

Oplus_131072

 

ग्रामपंचायत आश्वी खुर्द या गावांमध्ये ग्रामसेवक श्री प्रवीण इल्हे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावात अनेक प्रश्न प्रलंबित होते, गावातील स्वच्छता, आरोग्य, विकास कामे, हे सगळे प्रश्न प्रलंबित होते, प्रवीण इल्हे यांनी पदभार स्विकारल्यानंतर गावातील स्वच्छतेच्या बाबतीतले सर्व प्रश्न मार्गी लावले. दलित वस्ती, जनसुविधा सर्व कामे योग्य रितीने मार्गी लागले. तसेच अनेक सर्व सामान्य जनतेचे कामे तात्काळ मार्गी लावत व प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणत व सर्वांशी मनमिळावू पणाने काम करून गावातील नागरिकांच्या मनावर चांगला ठसा उमटविला, त्याच बरोबर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना घरकुल, रोजगार हमी योजने अंतर्गत गायगोठा तसेंच इतर सर्व योजना गरजू लाभार्थी पर्यंत पोचविण्याचे काम त्यांनी केले. गावातील स्वछता विषयक कामे निव्वळ खुर्ची वर बसून आदेश न करता प्रत्यक्ष जाऊन व येणाऱ्या अडचणी दूर करून मार्गी लावले, महिला सक्ष्मीकरण, शाळा, अंगणवाडी डिजिटल करणे, सौर ऊर्जेचा वापर हेतूने सौर हायलॅम्प बसविले, दिव्यांग बांधवाना लाभ मिळून देणे, असे कित्येक कामे त्यांनी त्याच्या कार्यकाळात केलेले असल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत त्यांचे कौतुक करत . त्याची झालेली बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणीचा थेट ग्रामसभेत करत आग्रह धरला, त्यामुळे सरपंच सौ. अलका बापूसाहेब गायकवाड व उपसरपंच श्री.बाबासाहेब भवर यांनीही मा. गटविकास आधिकारी यांना पत्र देऊन बदली रद्द करण्याची मागणी केलेली आहे.

 

 

 

Oplus_131072

 

आम्ही गेली दिड वर्षा पूर्वी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. प्रवीण इल्हे यांनी पदाधिकारी, ग्रामस्थ व शासन यांच्यातील दुवा होत विकास कामे व दैनंदिन कामकाज अतिशय योग्य पणे मार्गी लावलेले आहे. त्यामुळे त्यांची अचानक झालेली बदली मुळे नागरिक व पदाधिकारी यांच्यात तीव्र संताप झालेला असल्याने तात्काळ बदली आदेश रद्द करावा अन्यथा ग्रा.प.कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देत लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे

 

 

सौ.अलका बापूसाहेब गायकवाड -प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *