आश्वी l झुंजार न्यूज
आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेतून काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आसपास असतात. संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी खुर्द येथील भाऊ प्रतिष्ठानच्या वतीने ” शैक्षणिक पालकत्व ” या अभियानातून परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर गेलेल्या दोन अन्याथ विद्यार्थिनींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून त्यांचा शिक्षणाचा मार्ग सुकर करून देण्यात आला .

शासनामार्फत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जातं. यामुळे इयत्ता आठवीपर्यंत 100 टक्के विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षण मोफत होत असल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात. मात्र त्यापुढील शिक्षणासाठी पालकांना स्वत: खर्च करावा लागतो. गरीब कुटुंबातील पालकांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. मुलांच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ ठरल्याने पालक मुलांना शाळेतून काढून घेतात. काही पालक आपल्या मुलांना इतरत्र रोजागारासाठी पाठवतात. हा आघात मुलांपेक्षा मुलींवर अधिक मोठ्या प्रमाणात होतो. शिक्षण सुरू असताना आठवीनंतर मुलींना शाळेतून काढून घेण्याचं प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. शालेय खर्चासाठी शिक्षण थांबलेल्या अशा मुलींना नंतर घरात ठेवण्यापेक्षा अल्पवयातच त्यांचं लग्न लावून देण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. अलिकडच्या काळात बालविवाहाचं प्रमाण ग्रामीण आणि शहरी भागातही वाढताना दिसत आहे. याच
विचारातून सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी ” भाऊ प्रतिष्ठानच्या वतीने कै आप्पासाहेब बाबासाहेब घाने यांच्या दोन लहान मुलींना प्रतिष्ठानच्या वतीने दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्य व शालेय ड्रेस देऊन संपूर्ण शिक्षणाची पालकत्व स्विकारले .

यावेळी ” भाऊ प्रतिष्ठान ” कै आप्पासाहेब घाने यांच्या या दोन मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्विकारत आश्वी बु॥ येथील रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इग्लिश स्कुल मध्ये जावून या दोन मुलींना शालेय साहित्यासह शालेय ड्रेस देण्यात आले .

यावेळी भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास साहेबराव गायकवाड व सचिव सतीश निवृत्ती गायकवाड , राजू पाचरणे , सुनिता पाचरणे , म्हसे ताई , विकास भडकवाड , चव्हाण सर आदी उपस्थित होते .

घाने यांचे हदयविकाराने दुःख निधन झाल्याने घाने कुटुबांची आर्थिक परिस्थिती खालावल्यानेचं भाऊ प्रतिष्ठान च्या वतीने शैक्षणिक दत्तक घेतलेल्या या मुलीची पुढील शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी भाऊ फाउंडेशनच्या वतीने घेण्यात असून त्यांना शैक्षणिक बाबतीत कुठली ही अडचण येवून देणार नाही तर परिसरातील अन्याथ मुलीकरिता भाऊ प्रतिष्ठान हे सामाजिक उपक्रम राबविणार
विकास गायकवाड ( सामाजिक कार्यकर्ते )
