संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील साईबाबा मंदिराच्या वतीने दर वर्षाप्रमाणे याही वर्षी राजापूर ते शिर्डी अशी पायी दिंडी शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे
या पायी दिंडीचे समनापुर चौफुली जवळ आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते स्वागत करून साईबाबांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला यावेळी आमदार खताळ यांच्या हस्ते व राजापूर येथील साईभक्तांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी राजापूर येथील साईबाबा मंदिराचे बाबू सोनवणे यांच्या हस्ते आ. अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पालखी वडगाव पान निळवंडे जांभूळवाडी फाटा मार्गे शिर्डीकडे मार्गस्थ झाली
यावेळी गहीनाथ हासे,ज्ञानदेव हासे,भाऊराव देशमुख ,बाबू सोनवणे, नानासाहेब हासे भास्कर हासे ,संदेश देशमुख ऋषी हासे ,जिजाबा हासे , राजाराम हासे यांच्यासह राजापूरचे साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
