आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील विविध कार्य़कारी सेवा सोसायटी ची गुरूवार दि २६ जुन रोजी एक सदस्य निवडणुक संगमनेर येथील उपनिबंध सहकारी कार्यालयामध्ये निवडणुक अधिकारी तथा सहकार अधिकारी श्रेणी १ राजेद्र वाकचौरे यांच्या उपस्थित संपन्न झाली.यामध्ये विखे गटाला ६ तर थोरात गटाला ६ मते मिळाल्याने समानता निर्माण झाल्याने मात्र चिठ्ठीद्रारे थोरात गटाची लॉटरी लागली .
  

 

 

 

 

Oplus_131072

   
संचालक कैलास सहादु मुळे यांचे निधनामुळे सोसायटीच्या १३ संचालकापैकी रिक्त झालेल्या एक संचालक पदाकरिता १२ संचालकामधून निवडणुक घेण्यात आली .

Oplus_131072
    
विखे गटाकडुन उमेदवार म्हणून राजेंद्र सहादु मुळे तर थोरात गटाकडुन सेवानिवृत्त शिक्षक वेणुनाथ तात्याबा गायकवाड यांना उमेदवारी दिली गेली संगमनेर मधील उपनिबंध सहकारी कार्यालयात विदयमान १२ संचालकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मात्र 
विखे व थोरात गटाला ६–६ असे सारखे मतदान पडलं असता पुढील प्रक्रिया ही चिठ्ठी व्दारे झालल्याने यात संचालक म्हणून थोरात गटाचे वेणुनाथ तात्याबा गायकवाड हे नशिबवान ठरले .
Oplus_131072
यावेळी नुतन संचालकांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात , दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख ,
जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , युवा नेते विजयराव हिंगे , कृ उ बा समिती उपसभापती  गिताराम गायकवाड , संरपच नामदेव शिंदे , उपसंरपच बबनराव शिंदे , संतोष ताजणे , माजी संरपच महेश गायकवाड यांनी अभिनंदन केले .
Oplus_131072
आश्वी बुद्रुक विविध कार्य़कारी सेवा सोसायटी ही प्रगतीपथावर असून सोसायटीच्या माध्यमातून गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे . सोसायटीने लोकांना व्यवसायाकरिता भाडे तत्वावर गाळयांची निर्मिती केली तर प्रवरा मेडिकल ट्रस्टकरिता ” बाह्य रूग्णालय ” करिता सोसायटीने आपल्या इमारतीमध्ये जागा उपलब्ध करुन गावाच्या आरोग्याचा मोठी समस्या दूर केली .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *