कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे शिक्षणामध्ये मोठा बदल घडणार : प्राचार्य देवराम वडितके

 

 

 

आश्वी | झुंजार न्यूज

 

 

दिवसेन दिवस समाजामध्ये तसेच शिक्षण प्रणालीमध्ये मोठा बदल होत चाललेला आहे.जग आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय कडे वळाले आहे.यामुळे शिक्षणामध्ये मोठा बदल घडणार आहे. नविनबदल स्विकारून पालकांनी व शिक्षकांनी काळानुरूप पुढे जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवराम वडितके यांनी केले.

 

 

 

 

रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) मध्ये इत्ताय ५ ते १० च्या शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य देवराम वडितके बोलत होते माजी सरपंच तथा शाळा व्यावस्थापण कमिटीचे ज्येष्ठ सदस्य बाळकृष्ण होडगर,सदस्या सुमतीलाल गांधी, प्राचार्य देवराम वडितके,पर्यवेक्षक दिपक चव्हाण,रमेश थेटे,गुरुकुल प्रकल्प प्रमुख मोहन घिगे, सुवर्णा वाकचौरे,पालक संदिप चतुरे,शरद कांबळे,सतिष क्षिरसागर,कामिनी गायकवाड,आर्चना बर्डे,सुभाष गायकवाड, सचिन जऱ्हाड,संतोष बिडवे,जयदीप सांगळे,सोमनाथ गाडेकर, पत्रकार वैभव ताजणे यासह पालक शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कमिटीचे सदस्य बाळकृष्ण होडगर होते तर कार्य़क्रमांचे सुत्रसंचालन अनिता गाडे यांनी केले.

 

 

 

 

पुढे बोलताना प्राचार्य देवराम वडितके म्हणाले की,संस्थेच्या नवीन धोरणामुळे शिक्षणाच्या दर्जा दिवसेन दिवस सुधारत असल्यामुळे यंदा पाचवीसाठी १२० विद्यार्थी विक्रमी नोंदणी झाली.रयत शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या अश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आश्वी बुद्रुक मध्ये मराठी माध्यमा बरोबर गुरूकुल सेमी इंग्लिश माध्यम शिकवले जाते.

 

 

 

Oplus_131072

 

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा पालक मेळाव्याचे मुख्य उद्देश आहे.विद्यार्थी पालक व शिक्षक हे त्रिकोणाचे तीन बिंदु आहे. हे तिन्ही बिंदु एकत्र आल्यानंतर विद्यार्थीचा खरा विकास होणार आहे.

 

 

दिपक चव्हाण, पर्यवेक्षक

 

 

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एक अशी संकल्पना आहे, जी संगणक प्रणालीचा मानवी बुद्धीला कार्ये करण्याची क्षमता देते. यामध्ये शिकणे, तर्क करणे, समस्या सोडवणे, नैसर्गिक भाषा समजून घेणे आणि नवीन माहितीशी जुळवून घेणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.

 

 

बी एस सहाणे, विभाग प्रमुख कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed