संगमनेर l झुंजार न्यूज

पुणे-नाशिक महामार्गावर तालुक्यातील चंदनापुरी घाट शुक्रवारी (दि.५) सकाळी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाची बस उलटून झालेल्या अपघातात सहा विद्यार्थी जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनेश्वर विद्यालयाची बस (एमएच १४ बीए ८९३२) साकूर आणि परिसरातून ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर घाट परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. ही स्कूल बस घाटात आली असताना समोरून आलेल्या एका वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली.

अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, हवालदार अमित महाजन व डोळासने महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी विद्यार्थ्यांना चंदनापुरी घाटातील गुंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली.
Oplus_131072
दरम्यान, या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत आणण्यासाठी बसचा वापर होतो. मात्र या स्कूल बस नियम आणि अटींचे पालन करतात का, याबाबत अनेकदा शंका उपस्थित होते. सद्यःस्थितीत अनेक स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले जातात, तसेच वाहनांच्या देखभालीसंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण होते. प्रादेशिक परिवहन विभागाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व बसची कसून तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत पालक व्यक्त करत होते.
Oplus_131072
.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, विजय राहणे, इंद्रजित खेमनर, सरपंच भाऊराव रहाणे, बाळासाहेब सागर, किरण राहणे, बालमशेठ सरोदे, आनंदराव कडणे, बाळू सरोदे, संदीप सरोदे, दिनकर भालेराव आदींनी घाटातील रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यावेळी मुख्याध्यापक, तालुका पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे उपस्थित होते.
Oplus_131072
आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ, शिवसेनेचे रामभाऊ रहाणे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे, किरण भागवत, किसन सरोदे, आनंदराव कढणे, सेक्रेटरी अनिल कढणे, रामदास पर्वत, अशोक खेमनर यांनीही रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *