आश्वी । झुंजार न्यूज

शिबलापूर येथे बेकायदा वाळू उपशाविरोधात उपोषणाला बसलेल्या संजय मुन्तोंडे यांच्या घरी उत्कर्षा रुपवते यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. “चळवळीतून संघर्ष सातत्याने चालू असतो, मात्र प्रकृती महत्त्वाची असते. प्रकृती चांगली असली तर संघर्षाला अधिक बळ मिळते,” असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य सचिव उत्कर्षा रुपवते यांनी यावेळी व्यक्त केले.

 

 

Oplus_131072
उत्कर्षा रुपवते पुढे म्हणाल्या की , संध्याच्या परिस्थितीवर प्रशासनातील लोकही हतबल झाले असून, चोहोबाजूंनी दबाव असल्याने ते निर्णय घेऊ शकत नाहीत, असेही उत्कर्षा रुपवते म्हणाल्या. संजय मुन्तोंडे हे शिबलापूर माळेवाडी येथे बेकायदा वाळू उपशाविरोधात उपोषणाला बसले होते नुकतेचं प्रशासनाने त्यांच्या असणाऱ्या मागणी मान्य करत त्यांचे उपोषण सोडविले .
Oplus_131072
यावेळी संजय मुन्तोंडे यांनी वाळू डेपोतून वाळूबाबत होणाऱ्या सावळा गोंधळा विषयी आपली खदखद व्यक्त केल्याने रुपवते यांनी प्रशासन हे राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर चालत असून भविष्यात यांचा मोठा तोटा लोकांना सहन करावा लागणार आहे . यावेळी प्रा. अनिल मुन्तोंडे , राजेंद्र मुन्तोंडे , उपसंरपच सुनिल मुन्तोंडे यांच्यासह मोठया संख्येने तरुण उपस्थित होते . 

 

oplus_1024
उत्कर्षा रुपवते या पूर्वी काँग्रेसच्या प्रदेश महासचिव होत्या. तथापि, त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *