माजीमंत्री बाळासाहेब थोरात मा आ डॉ सुधीर तांबे यांची उपस्थिती,


माजी चेअरमन यांच्या हस्ते होणार इमारतीचे उद्घाटन

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सायं.5 महाराष्ट्राचे मा. महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात मा.आ.डॉ.सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थिती होणार असल्याची माहिती व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

 

थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यक्रमाबाबत माहिती देताना पांडुरंग पाटील घुले पुढे म्हणाले की, माजी शिक्षण व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने कायम सभासद शेतकरी कामगार व ऊस उत्पादक यांचे हित जोपासले असून उच्चांकी भाव दिला आहे. 5500 मेट्रिक टन व 30 मेगा वॅट वीज निर्मिती असा नवीन प्रोजेक्ट राज्यासाठी दिशादर्शक ठरलेल्या या कारखान्याने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अद्यावत व सर्व सोयीयुक्त नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही भव्य इमारत असून या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी 14 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 5 वाजता महाराष्ट्राचे माजीमंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब थोरात, कारखान्याचे मा.चेअरमन केरुजी हरुजी पा. गुंजाळ, बाजीराव पाटील खेमनर,लक्ष्मणराव कुटे, ॲड.माधवराव कानवडे,बाबासाहेब ओहोळ या सर्व माजी चेअरमन यांच्या हस्ते व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व सभासद शेतकरी ऊस उत्पादक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *