आश्वी । झुंजार न्यूज

नाशिक-पुणे हायवेवर मालपाणी लॉन्स येथे. राजस्थान युवक मित्र मंडळाचा संगमनेर फेस्टिवल आयोजीत मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी संगमनेर तालुक्याचे लाडके आमदार अमोलभाऊ खताळ साहेब हे कार्यक्रमस्थळी आले होते. त्यांनी या कार्यक्रमाचे उदघाट्न केले. कार्यक्रम संपुन ते लोकांना हात मिळवुन पुढील कार्यक्रमाला चाले होते. त्यावेळी विकृत मानसिकतेच्या माथेफिरूने आमदार अमोल भाऊ खताळ साहेब यांच्यावर हल्ला केला.

संगमनेर मध्ये ना भूतो ना भविष्यती भव्य अशा डोळे दिपवणाऱ्या महायुतीच्या महाविजय मेळाव्याच्या अभुतपुर्व यशानंतर विरोधकांची पायाखालची वाळू सरकल्यानेच अशी विनाशकाले विपरीत बुद्धी त्यांना सुचत आहे! *लोकप्रतिनिधीवर हल्ला करणे संगमनेरची संस्कृती नाही.
पोलिसांनी त्या हल्लेखोराची निपक्षपणे सखोल चौकशी करावी, लोकप्रतिनिधींवर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमावर पोलीसांनी कठोर कारवाई करावी अन्यथा विकृत बुद्धीच्या बाजारबुणग्यांना जशास तसे ठणकावून उत्तर देण्यात येईल याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी..

*हल्ल्याचा जाहीर निषेध*
नानासाहेब कदम ( उपाध्यक्ष रि पा ई आठवले गट )

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed