संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेरमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. फेस्टिव्हलच्या 17 व्या वर्षीच्या या कार्यक्रमामध्ये आमदार अमोल खताळ गेले होते. कार्यक्रम संपल्यावर आमदार अमोल खताळ माघारी निघाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय.

 

यावेळी हल्ला झाल्यानंतर अचानक खूप मोठा गोंधळ उडाला. सदर हल्लेखोराचे प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ असे नाव असे असल्याचे समजते आहे. यावेळी सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. दरम्यान आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोराव कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्यानंतर खताळ समर्थक आक्रमक झाले आहेत. तर या हल्ल्यानंतर पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील संतापले असून त्यांनी हल्ल्याचा निषेध केलाय. काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, संतप्त प्रतिक्रिया विखे-पाटील यांनी दिली आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed