आश्वी । झुंजार न्यूज

शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील  एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी, पल्लवी माणिक पाबळ हिने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) – जून २०२५ मध्ये ‘Mathematical Sciences’ या विषयात विशेष यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिने सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता मिळवून आपल्या कुटुंबाचे, गुरुजनांचे आणि संपूर्ण समाजाचे नाव उंचावले आहे.

पल्लवीचा विद्यार्थीदशेपासूनचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. अभ्यासू वृत्ती, प्रामाणिकपणा आणि आपल्या ध्येयाप्रती असलेली तिची एकनिष्ठता यामुळे ती नेहमीच इतरांपेक्षा वेगळी ठरली. तिच्या यशामागे तिच्या पालकांचे दिलेले संस्कार, गुरुजनांचे अनमोल मार्गदर्शन आणि स्वतःची अविश्रांत मेहनत यांचा मोठा वाटा आहे. आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात मुलींनी शिक्षण क्षेत्रात मिळवलेले असे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. पल्लवीने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थिनींसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल

पल्लवीचे हे यश केवळ एक टप्पा नसून, उच्च शिक्षण क्षेत्रातील तिच्या पुढील वाटचालीस निश्चित दिशा देणारे आहे. तिला आता NET, Ph.D. यांसारख्या उच्चस्तरीय परीक्षांमध्येही असेच दैदिप्यमान यश मिळवून शिक्षण क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. तिच्या या यशाबद्दल ग्रामस्थ , शिक्षक यांन अभिनंदन केले
आहे .

 

पल्लवी पाबळच्या या यशाने समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते आणि कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच गोड असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed