केंद्रीय गृह व सहकारीता मंत्री आदरणीय ना.अमीतजी शाह यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री मा.ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील डॉ सुजय विखे पाटील यांनी सदिच्छा भेट घेत लोणीला येण्याचे निमत्रंण दिले.
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला एन.सी.डी.सी च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध झाल्याने कारखान्याचे नुतणीकरण पुर्ण झाले असून १५ ऑक्टोबर २०२५ रोजी नवीन गाळप हंगामाचा शुभारंभही करण्यात येणार आहे.
तसेल लोणी बुद्रुक येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटीव व आदरणीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पिंप्री निर्मळ, अस्तगाव माथा शिव येथे पं.पू.प्रदिपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजनही दि.१२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या तीनही सोहळ्यांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास मा.ना.अमीतभाई शाह यांना निमंत्रीत केले असल्याची माहिती डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली आहे .
या सर्व कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याच्या केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील महीन्यात मा.ना.अमीतभाई शाह प्रवरानगर दौ-यावर येणार आहेत.