संगमनेर तालुक्यातील पूर्व भागात आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले पीक पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे
oplus_1024
गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पानोडी, शिबलापूर, पिंप्री लौकी, अजमपूर, खळी, झरेकाठी, चणेगाव, दाढ खुर्द, आश्वी, उंबरी बाळापूर, ओझर, शेंडगाव, मालुंजे, हंगेवाडी यासह बहुसंख्य गावांना फटका बसला आहे. बाजरी, मका, सोयाबीन, कांदा आणि जनावरांच्या चाऱ्यासह अनेक पिकांचे पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, काही घरांचेही नुकसान झाले आहे.
oplus_1024
या अतिवृष्टीमुळे खळी येथील वाघमारे कुटुंबाचे घर पाण्यात गेल्याने त्यांचे सर्व घरगुती साहित्य भिजून खराब झाले आहे. चणेगाव, झरेकाठी आणि खळी या गावांमध्ये असलेली तळी पूर्ण भरल्याने गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, संगमनेरचे गटविकास अधिकारी सिनारे, लघु पाटबंधारे मंडळाचे मंडलिक, पंचायत समितीचे जलसंधारण अधिकारी सतीश नरवरे आणि माजी पंचायत समिती सदस्य ॲड. पोपटराव वाणी यांनी तातडीने गावांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी कमी झालेले सांड दुरुस्त करून ओव्हरफ्लोचे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था केली. अजूनही चार-पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गावोगावी झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे ॲड. पोपटराव वाणी, राजहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश नागरे, शिबलापूरचे सरपंच प्रमोद बोंद्रे, पानोडीचे उपसरपंच विक्रमराजे थोरात, झरेकाठीचे सरपंच अशोक वाणी, दाढचे सरपंच सतीश जोशी, पिंप्री लौकीच्या सरपंच सौ. संगिताताई भारत गीते, राहुल खेमनर, मालुंजेच्या सरपंच सौ. सुवर्णाताई संदीप घुगे यांच्यासह अनेक शेतकरी आणि स्थानिक नेत्यांनी शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे .
आश्वी परिसरात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई दयावी