पानोडी ! झुंझार न्यूज

वेताळ बाबा युवा ग्रुप, पानोडी यांच्या वतीने नुकतेच एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे हे शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.

यावेळी, उपसरपंच विक्रम थोरात, समाजसेवक भारत शेवाळे, चेअरमन बबनराव कराड आदीसह मोठया संख्येने ग्रामस्थ , युवक उपस्थित होते .

 

 

शिबिर यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव, चैतन्य जाधव, प्रसाद जाधव, शरद पाबळ, साई जाधव, दीपक दिघे, अन्वर शेख, सार्थक जाधव , ओम जाधव आदीनी प्रयत्न केले .

या शिबिरासाठी संगमनेर येथील आधार ब्लड बँकेने सहकार्य केले. आधार ब्लड बँकेचे डॉ. प्रदीप जाधव, प्रवीण नेहे आणि दिव्या बांन्ते यांनी रक्त संकलनासाठी विशेष परिश्रम घेतले.

वेताळ बाबा युवा ग्रुपने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा फायदा होणार असून, समाजात एक चांगला संदेश पोहोचला आहे.. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *