केंद्रीय गृहमंत्री आणि पहिले सहकार मंत्री अमित शहा यांच्या शिर्डी आणि कोपरगाव दौऱ्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “सहकार पंढरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील त्यांच्या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः, या दौऱ्यामुळे भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाची शक्यता बळावली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



