आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण सहविचार बैठक गुरुवार दि . ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता शाहूनगर अकोले येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न होणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे नेते विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे .
या बैठकीला सुरेशराव देठे, रमेश शिरकांडे, चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, आणि राजेंद्र घायवट यांच्यासह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त उपस्थिती रहाणार आहे .
“यावेळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे . विशेषतः कोतुळची जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने, या जागेसाठी इच्छूक असलेल्या सर्व उमेदवारांशी चर्चा करून समाजाच्या हितासाठी एकमताने बौद्ध उमेदवार निवडून देण्याबाबत सकारात्मक विचार विनिमय केला जाणार आहे .
यावेळी विजयराव वाकचौरे यांनी, पक्षाच्या पलीकडे जाऊन समाज म्हणून योग्य निर्णय घेण्याची ही वेळ असल्याचे अधोरेखित केले. आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना, प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी सामूहिक भूमिका घेण्यात येणार आहे .
तरी या बैठकीला विविध पक्षाचे , संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावून येणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचा संकल्प करून समाजाच्या हितासाठी योग्य उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहे .