महाराष्ट्रातील पाच निवडक अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक म्हणून सन्मान



संगमनेर । झुंझार न्यूज

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर यांना गणितीय संगणन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था मॅथवर्क्स यांच्याकडून ‘मॅथवर्क्स क्रेडेन्टीअलिंग एजुकेशन’ हा प्रतिष्ठित पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रताप गवांदे, नॅशनल अकाउंट सेल्स मॅनेजर, मॅथवर्क्स इंडिया आणि क्रेग सॅंटोस, सीनियर डायरेक्टर, वर्ल्डवाइड ट्रेनिंग सर्व्हिसेस अँड एज्युकेशन, मॅथवर्क्स यांच्या हस्ते हॉटेल हयात, पुणे येथे प्रदान करण्यात आला.

महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश आणि डॉ.व्ही.एस.गडाख, इन्स्टिट्यूट मॅटलॅब समन्वयक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा सन्मान अमृतवहिनी कॉलेजच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील मॅटलॅब आणि सिमुलींकच्या आदर्श आणि प्रभावी अंमलबजावणीबद्दल देण्यात आला आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील साधनांचा प्रभावी वापर संस्थेतील किमान चाळीस टक्के वापरकर्त्यांनी मॅथवर्क्स साधनांचा सक्रियपणे उपयोग केलेला असल्याने आणि अभ्यासक्रमात मॅटलॅब आणि सिमुलींकचे एकत्रीकरण, विद्यार्थी प्रकल्प, स्पर्धा आणि नियमित अभ्यासक्रमामध्ये उद्योगमानक पद्धतीने या साधनांचा समावेश केल्यामुळे या पुरस्कारासाठीची निवड करण्यात आली. अमृतवाहिनी हे महाराष्ट्रातील या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या फक्त पाच निवडक महाविद्यालयांपैकी एक आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास, संशोधन आणि उद्योगाभिमुख कौशल्यविकास क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्रयत्नांची मॅथवर्क्सतर्फे दखल घेण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. हा सन्मान अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाधारित कौशल्यविकासासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करून सक्षम होण्यास मदत होत आहे.

या पुरस्काराच्या यादीत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू), एमआयटी अभियांत्रिकी अकादमी (एमआयटीएओई), आलंदी, पुणे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी), पुणे, आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (एसव्हीआरआय), पंढपूर या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

या पुरस्काराबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष, मा.मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त मा.डॉ.सुधीरजी तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त मा.शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉ.जे.बी.गुरव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रा.व्ही.पी. वाघे यांचेकडून अभिनंदन होत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *