शिर्डीत नगरपरिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले

शिर्डी : झुंझार न्यूज

शिर्डी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वारे वेगाने वाहू लागले असून, प्रचाराला मोठा जोर आला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन सिताराम गायकवाड यांच्या निवडणूक प्रचाराचा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

 

प्रचाराचा नारळ फोडण्यापूर्वी उमेदवार सचिन गायकवाड यांनी शिर्डी येथील बुद्ध विहारास भेट दिली. यावेळी त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.

 

 

प्रचाराच्या शुभारंभानिमित्त प्रभाग क्रमांक ६ मध्ये एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीने प्रभागातील वातावरण ढवळून काढले. मतदारांच्या भेटीगाठी घेत आणि जोरदार घोषणाबाजी करत रॅली पुढे सरकत होती.

 

 

या प्रचार शुभारंभ प्रसंगी राजेंद्र गोंदकर, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, अलकाताई शेजवळ, नितीन शेजवळ, नितीन धिवर, भीमराज बनसोडे , शिल्पा गायकवाड , मनिषा गायकवाड , माया गायकवाड , अनिल गायकवाड , बाबासाहेब शेजवळ , कैलास आरणे , शंकर त्रिभुवन ‘ सोनाली धिवर , विमल शेजवळ , आशा शेजवळ , मंगल मोकळ , विकी गायकवाड , रमेश कुऱ्हाडे , रावसाहेब शेजवळ , राहुल शेजवळ , पुजा खैरनार , उमेश शेजवळ , रितेश घोडगे , अरुण शेजवळ , किरण शेजवळ , पुर्णिमा शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये प्रभागातील नागरिक, महिला वर्ग आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक ६ मध्ये सचिन गायकवाड यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *