परिवर्तनाची लाट: महिला व तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद; विकासाची नांदी आणि रोजगाराची हमी
शिर्डी । झुंझार न्यूज
शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून, प्रचाराचा ज्वर आता शिगेला पोहोचला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना प्रभाग क्रमांक ५ मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. शितल रविंद्र (नाना) त्रिभुवन यांच्या प्रचारात मोठी रंगत निर्माण झाली असून, ‘मशाल’ हे चिन्ह घेऊन त्या मतदारांसमोर परिवर्तनाचा नारा देत आहेत
Oplus_131072
सौ. शितल त्रिभुवन यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅली आणि कोपरा सभांमध्ये प्रभागातील नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या प्रचारात महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. “प्रभागात आता बदल हवा आहे,” अशी भावना व्यक्त करत तरुण वर्ग मोठ्या संख्येने मशालीच्या मागे उभा राहिला आहे. रविंद्र (नाना) त्रिभुवन यांच्या जनसंपर्काचा आणि सामाजिक कार्याचा मोठा फायदा सौ. शितल यांना मिळत असल्याचे चित्र आहे.
Oplus_131072
प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना सौ. शितल त्रिभुवन यांनी प्रभागाचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून सेवेसाठी आहे. निवडून आल्यावर प्रभागात विकासाची नवी नांदी आम्ही नक्कीच आणू. आमचा मुख्य भर हा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर असेल.”
Oplus_131072
मूलभूत सुविधांवर देणार भर
शिक्षण: प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सोयी-सुविधा निर्माण करणे. पाणी आणि रस्ते: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे आणि अंतर्गत रस्ते दर्जेदार बनवणे. घरकुल योजना: गरजूंना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देणे. स्वच्छता: प्रभागातील कचरा व्यवस्थापन आणि गटारींची नियमित स्वच्छता करून आरोग्यदायी वातावरण राखणे
“सर्वसामान्यांना न्याय देणार आणि प्रभागाचे रूपडे पालटणार,” या घोषणांमुळे सौ. शितल त्रिभुवन यांचे पारडे जड मानले जात आहे. शेवटच्या टप्प्यात मतदारांनी दाखवलेला विश्वास पाहता, मतदानाच्या दिवशी मशाल काय कमाल दाखवणार आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे आता संपूर्ण शिर्डी शहराचे लक्ष लागले आहे.