शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने निवडणुकीच्या धामधुमीत प्रचंड वाढ झाली आहे. यातच प्रभाग क्रमांक २ मधील अपक्ष उमेदवार सतीश गोविंदराव गोंदकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, त्यांचा झंझावत सध्या संपूर्ण प्रभागात चर्चेचा विषय बनला आहे.
उमेदवार सतीश गोंदकर हे अक्षरशः पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळातून आणि घराघरांत जाऊन ते मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या या प्रचार मोहिमेत महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. असंख्य महिला समर्थक त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून घरोघरी फिरत आहेत आणि मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
प्रभागातील नागरिकांकडून गोंदकर यांना मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता, राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. सर्वसामान्यांमधून आणि मतदारांमधून सतीश गोंदकर हे या निवडणुकीत ‘जायंट किलर’ ठरणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या प्रस्थापित उमेदवारांना ते कडवे आव्हान देत असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्रमांक २ मध्ये दिसत आहे.
शेवटच्या दोन दिवसांत गोंदकर यांनी आपल्या जनसंपर्कावर आणि वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला असून, मतदारांच्या समस्या जाणून घेत त्यांनी विकासाचा विश्वास दिला आहे. त्यांच्या या आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे निवडणुकीचे पारडे फिरताना दिसत असून महिलासह तरुणांमध्ये सतिष गोंदकर हेच विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करत आहे .
महिलासह घरो घरी मतदार आपले मत व्यक्त करताना दिसत असून सतिष गोंदकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे .