किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत,

मैथिली तांबे, सुवर्णा खताळ सह अपक्ष उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद.

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी काल मंगळवारी १५ प्रभागात २७ नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी शहरात मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याने सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
तर अँग्लो उर्दू हायस्कूल मतदान केंद्र परिसरात दोन गटात हमरा तुमरी झाली. कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला.
ही घटना वगळता सांयकाळी उशिरा अंदाजे ७२.७५ टक्के शांततेत मतदान झाले.

 

 

एक नगराध्यक्ष, २७ नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या सेवा समिती, महायुती, अपक्ष उमेदवारांचे भवितव्य काल ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले. तर प्रभाग एक ब, प्रभाग दोन ब व १५ ब मधील तीन जागांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर २१ तारखेला मतमोजणी होवून निकाल जाहिर केला जाणार असल्याने सेवा समिती की महायुती बाजी मारते या कडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

 

संगमनेर नगरपालिका निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे व आमदार अमोल खताळ या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांनीही महायुतीसाठी प्रचार केल्याने त्यांच्याही आगामी राजकीय हस्तक्षेपाला यश येते की नाही याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

 

 

पालिकेच्या १५ प्रभागात निवडणुकीसाठी सकाळ पासूनच मतदार मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले.यामुळे साडेसात वाजेपासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत २१.६५ टक्के मतदान झाले होते. सकाळ पासूनच उमेदवार ,राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. गल्लो गल्ली, चौकात, कॉलनीत गर्दीने मतदानासाठी मतदार जात होते. महिला, तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक असे सर्वच मतदार करण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे होते. यामुळे सकाळ पासूनच मतदानाच्या प्रक्रियेला वेग आल्याने टक्केवारी वाढत गेली.

शहरातील इंदिरा नगर, जनता नगर, गणेश नगर, शिवाजीनगर, नेहरू चौक, घास बाजार, रंगार गल्ली अकोले नाका, जोर्वे नाका,नवीन नगर रोड, दिल्ली नाका, कुरण रोड,अशोक चौक, मोमीनपुरा, बाजार पेठ, मेन रोड, सय्यद बाबा चौक, नेहरू चौक सर्वच ठिकाणी मतदानासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली.
ज्ञानमाता विद्यालय, सह्याद्री विद्यालय, मेहेर विद्यालय, नगरपालिका शाळा, जिजामाता विद्यालय, शारदा विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, सह्याद्री कॉलेज, आदर्श विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय, पेटीत विद्यालय, अशा सर्व सर्वच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरत सुरळीत सुरू होती. ईव्हीएम मशीन कुठेही खराब अथवा बंद पडले नाही. संगमनेर सेवा समिती व महाविकास आघाडीत सरळ लढत असली तरी कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. माजीमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे, सुवर्णा खताळ, मेघा भगत, सुषमा तवरेज, आदींसह अपक्ष उमेदवार शहरात फिरून मतदानाची माहिती घेत होते.

तर नगरसेवक पदाचे उमेदवारही आपल्या प्रभागात ठाण मांडून होते.या निवडणुकीत संगमनेर सेवा समिती व महायुतीत सरळ लढत होत असली तरी काही प्रभागात भाजपा व राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होती. तर अपक्षांनीही काही प्रभागात आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

.
काँग्रेस ,शिवसेना उबाठा, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी आठवले गट, तर पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार यासह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत होते. तरीही कोठेही हाणामारी, हमरा तुमरी, वादावादी अनुचित प्रकार घडला नाही.
दुपारी दीड वाजेपर्यंत ३६.३३. मतदान झाले होते.दुपारी काहीशी मंदावलेली मतदानाची प्रक्रिया पुन्हा तीन वाजता जोमाने सुरू झाली.साडेतीन वाजेपर्यंत ५२.१६ टक्के मतदान झाले. यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याने रांगा लागल्या होत्या.

एक नगराध्यक्ष व दोन नगरसेवक पदासाठी मतदान करावयाचे असल्याने प्रक्रिया संथ गतीने सुरू होतो. वेळ खाऊपणामुळे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदाराची वेळ असली तरी अनेक मतदान केंद्रावर रांगा असल्याने साडेसहा सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.

अँग्लो उर्दू हायस्कूल परिसरात किरकोळ बाचाबाची वगळता प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून नगरपालिका क्रीडा संकुलात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असून बंदोबस्त तयार करण्यात आला आहे.

 

शहरात मंगळवारी मतदानाच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होतो याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

 

आमदार सत्यजित तांबे डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. हर्षल तांबे, उमेदवार मैथिली तांबे, सुवर्णा खताळ, मेघा भगत, सुषमा तवरेज सह इतर अपक्ष उमेदवारांनी आपल्या प्रभागात मतदानाचा हक्क बजावला.

.

शहरात एकूण ५७ हजार ७१४ मतदार आहे. यात पुरुष मतदार २८ हजार ३९० तर महिला मतदार २९ हजार ३२४ असून सांयकाळी उशिरा ७२.७५ टक्के मतदान झाले असून ४१ हजार ९९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, डॉ. सुधीर तांबे शहरात फिरून प्रभागात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेत होते. पदाधिकारी कार्यकर्ते मतदान करण्यासाठी आवाहन करत होते.

शहरात सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केल्याने रांगा लागल्या होत्या.काही मतदान केंद्रांवर साडे पाच वाजेपर्यंत आत प्रवेश केलेल्या मतदारांची संख्या अधिक असल्याने सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
निवडणूक निर्णय अधिकारी- अरुण उंडे.

 

 

शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल मतदान केंद्र परिसरात कार्यकर्त्यात किरकोळ बाचाबाची झाल्याने एकमेकांवर धावून गेले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला.

समीर बारवकर- पोलीस निरीक्षक

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *