राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण

कऱ्हे : झुंझार न्यूज

लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान (निमोण तळेगाव गट) आणि राज्याचे माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कर्हे प्रीमियर लीग’चे (के.पी.एल.) चौथे पर्व अत्यंत उत्साहात पार पडले. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या अटीतटीच्या स्पर्धेत पिंपळे येथील ‘हर हर महादेव’ संघाने अंतिम विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी राजहंस दूध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख यांनी खास उपस्थिती लावून सामन्याचा आनंद घेतला. देशमुख साहेब व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना व उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी आणि रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

 

या स्पर्धेत अनेक नामवंत संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ‘हर हर महादेव संघ, पिंपळे’ या संघाने प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. तर द्वितीय क्रमांक: कोंबलने इलेव्हन , तृतीय क्रमांक: सह्याद्री ११ घुलेवाडी , चतुर्थ क्रमांक: लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, निमोण

या भव्य बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बी. आर. चकोर , सुभाषराव सांगळे, देवराम गुळवे, सरपंच सुभाष सानप, अनिल तपासे, संदीप कांडेकर, संपत कांडेकर, संतोष डोंगरे, सुनील सानप, अनिल घुगे, गोकुळ सानप, अजय गुरकुले यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुनील गुळवे तसेच शिवराज्य निर्माण संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. अंतिम सामना पाहण्यासाठी कर्हे गाव आणि पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धेचा समारोप झाला.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed