आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील खांबे येथील ग्रामदैवत मोठेबाबा यांच्या यात्रा उत्सवाचे औचित्य साधून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्पोर्ट क्लब’च्या वतीने बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी भव्य राज्यस्तरीय शुटिंग हॉलिबॉल ‘डे-नाईट’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी होणार असून, खेळाडूंना रोख स्वरूपात मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भरघोस बक्षिसांची लयलूट
या स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षिसांचे स्वरूप आणि प्रायोजक खालीलप्रमाणे आहेत
प्रथम बक्षीस: १५,०००/- रुपये (प्रायोजक: बाबासाहेब सिताराम लबडे, माऊली हायड्रालिक्स).
द्वितीय बक्षीस: ११,०००/- रुपये (कै. रामप्रसाद आडभाई यांच्या स्मरणार्थ दादाहरी यशवंता आडभाई, श्रीराम एंटरप्रायजेस, आळंदी).
तृतीय बक्षीस: ९,०००/- रुपये (प्रायोजक: राजेंद्र कुशाबा गायकवाड).
चतुर्थ बक्षीस: ५,०००/- रुपये (प्रायोजक: बाबासाहेब कुशाबा दातीर).
पाचवे ते आठवे बक्षीस: प्रत्येकी २,१००/- रुपये (प्रायोजक: अजित बाळासाहेब कापडी).
याशिवाय खेळाडूंच्या कौशल्याचा गौरव करण्यासाठी उत्कृष्ट नेटमॅन, उत्कृष्ट शूटर आणि उत्कृष्ट डिफेंडर यांना प्रत्येकी १,०००/- रुपयांचे वैयक्तिक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
सहभागासाठी आवाहन
या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांसाठी प्रवेश शुल्क २००/- रुपये निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेचे नियोजन चोख राहावे यासाठी आयोजक कमिटी सज्ज झाली आहे. इच्छुक संघांनी नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी निवृत्ती इले सर, रामदास जोरी, इम्रान हबीब शेख, चेतन पोंदे, सुनील जोशी, बाळू गायकवाड, गोरख दातीर, आणाजी दातीर, डॉ. आदिनाथ सा. दातीर, सुनील नानासाहेब दातीर, संतोष बुधे, सागर शिंदे, बबलू गायकवाड, हर्षल पोंदे आणि अदिल शेख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्पोर्ट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
खांबे येथील मोठेबाबांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या या रोमांचक सामन्यांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Post Views: 275

