रेल्वे घालवली कोणी हे ओळखा : माजी मंत्री बाळासाहेब थोरात


आपली रेल्वे पळवली पेटून उठा — आमदार सत्यजित तांबे

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर प्रेम केले 40 वर्षात सर्वांना अभिमान वाटेल असे काम केले संगमनेर तालुक्याचा लौकिक वाढवला. निळवंडे धरण, थेट पाईपलाईन द्वारे पाणी यासाठी कोणीतरी कष्ट केले हे लक्षात ठेवा. आपण मंत्री असताना रेल्वे मार्ग निश्चित केला त्यावेळेस कोणतीही अडचण नव्हती. मग आता काय अडचण आली. रेल्वे घालवली कोणी हे ओळखा ,याचबरोबर मागील एक वर्षात तालुक्यात वाढलेल्या अमली पदार्थांची तस्करी आणि यामुळे तालुका उध्वस्त करू पाहणाऱ्यांना वेळीच रोखा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून संगमनेर तालुक्याची रेल्वे पळवली आहे पेटून उठा असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

संगमनेर सेवा समितीच्या वतीने गणेश नगर येथे सांगता सभेमध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,सौ दुर्गाताई तांबे, उत्कर्षा ताई रूपवते, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड ,अर्चना दिघे, डॉ. मैथिलीताई तांबे ,बाळकृष्ण महाराज कर्पे , रामहरी कातोरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा. मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, चाळीस वर्षे जनतेने संधी दिली. त्या माध्यमातून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. प्रत्येकाला अभिमान वाटेल असे काम केले. संगमनेर बस स्थानक, निळवंडे धरण, थेट पाईपलाईन द्वारे पाणी याचबरोबर शहराची भरभराट आणि समृद्धी कशी होईल यासाठी काम केले. गरीब माणूस आनंदी होण्याकरता राजकारण केले. अगदी विरोधकही आपल्यावर व्यक्तिगत कधी टीका करत नाही.

मी मंत्री होतो त्यावेळेस रेल्वे मार्ग प्रस्तावित झाला. 400 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. मग हा मार्ग घालावा कोणी. नवीन लोकप्रतिनिधी नेहरू गार्डन मधील रेल्वे आहे का पळून न्यायला हे उत्तर देतात . तालुका कोणत्या दिशेला चालला आहे .तालुक्यात गांजा, ड्रग्स अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. यांना कुणाचा हात आहे.

काही लोकांनी विधानसभेमध्ये चुकीचे आरोप केले. विधानसभा काय महाराष्ट्र तुमच्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाही. हे लक्षात ठेवा.

 निळवंडे धरण, विमानतळ, रेल्वे या गोष्टी पिढ्यापिढ्यांच्या असतात. विकासासाठी लढा सुरू राहणार आहे जनतेची साथ गरज आहे .पुन्हा चुका होऊ देऊ नका. तालुक्यामध्ये कामे रखडवली जात आहे सर्व चुकीचे चालले असून तालुका उध्वस्त करणाऱ्या लोकांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, एक वर्षांमध्ये रेल्वे पळवली उद्या पाणी पळवतील. संगमनेर तालुक्यातील जनतेने पेटवून उठले पाहिजे. एक डिसेंबरला येथील नवीन लोकप्रतिनिधी म्हणतो की रेल्वे पळवायला ती काय बागेतील रेल्वे आहे का आणि तीन तारखेला केंद्रीय मंत्री रेल्वे मार्ग बदलण्याचे सांगतात.

बाहेरच्या रिमोटवर चालणारा लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे. संगमनेरची सत्ता येथे पाहिजे. हक्काची माणसं पाहिजे. संगमनेर सेवा समितीची सत्ता आल्यानंतर रामनगर, गांधीनगर, श्रमिक नगर मधील गरीब जनतेला हक्काची घरे देण्यासाठी काम केले जाईल असे आमदार तांबे म्हणाले

यावेळी मा आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे , विश्वासराव मुर्तडक, उत्कर्षताई रुपवते दिलीपराव पुंड याचीही भाषणे झाली.

यावेळी संगमनेर शहरातील व गणेश नगर मालदार रोड परिसरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री सर्वांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार

संगमनेर तालुक्यातील रेल्वे ही पुढील अनेक पिढ्यांसाठी आहे. त्यामुळे अनेक युवकांना पुणे येथे नोकरी करता सोयीस्कर होणार आहे. जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. रेल्वे करता आपण 22 तारखेला सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असून नुकतीच लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. वीस मिनिटे झालेल्या या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिले असून यासाठी मोठे जनआंदोलन होत असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed