आश्वी : झुंजार न्यूज
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती तसेच बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांतून घडलेले छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असलेला चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान व राष्ट्रनिष्ठ नवयुवक याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून अभ्यासासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.

.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. अमित शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रउभारणी साठीच्या विचारसरणीवर तसेच राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार, मूल्ये व राष्ट्रभक्तीची शिकवण आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
त्याचप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर स्मृती दिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा यथोचित सन्मान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी पत्रकार संजय गायकवाड, योगेश रातडीया,यमन पुलाटे, अनिल शेळके, राजेश गायकवाड हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ.सुवर्णा जाधव ,प्रा.नीतू मांढरे प्रा.संतोष वर्पे हे ही उपस्थित होते. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांनी ही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सिताराम अनाप यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता खळदकर व प्रा.अश्विनी आहेर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.मेनीनाथ औताडे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.
